Rishab Shetty On Kantara 2 : दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) 'कांतारा' (kantara) या चित्रपटाचं नाव सध्या सर्वांच्याच ओठावर आहे. कन्नडमध्ये चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादानंतर निर्मात्यांनी तो इतर भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला जोरदार प्रतिसाद मिळाला. छोट्या बजेटचा 'कांतारा' (kantara) पाहण्यासाठी प्रेक्षक चांगलीच गर्दी करत आहेत.
'कंतारा'ला ज्याप्रकारे प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे आणि लोकांमध्ये त्याची क्रेझ पाहायला मिळत आहे, अशा परिस्थितीत 'कंतारा'चा दुसरा भाग येणार का? या प्रश्नावर ऋषभ शेट्टीने आता उत्तर दिलं आहे.
'कंतारा 2'बद्दल काय म्हणाला ऋषभ शेट्टी?
अलीकडेच, पिंकविलाशी झालेल्या संभाषणात, ऋषभ शेट्टीला 'कंतारा 2' बद्दल एक प्रश्न विचारण्यात आला, ज्यावर तो म्हणाला, "मला अद्याप माहित नाही, मी ब्लँक आहे. मी आता दोन महिन्यांचा ब्रेक घेईन. मी ज्या चित्रपटांबद्दल विचार करायचो, मला जे बनवायचे होतं ते सगळं आता गायब झालं आहे. म्हणून मी नव्याने सुरुवात करेन. (Kantara 2 Will there be a second part of Kantara Director and actor Rishabh Shetty disclosed)
तो पुढे म्हणाला, "कंतारा रिलीज होऊन 35 दिवस झाले आहेत आणि आम्ही अजूनही या चित्रपटाचे प्रमोशन करत आहोत, त्यामुळे मी सध्या फक्त 'कंतारा'बद्दल बोलत आहे. 'कंतारा 2' बद्दल बोलणं खूप घाईचं होईल.
हिंदी रिमेकबद्दल सांगितली ही गोष्ट
आम्ही तुम्हाला सांगतो, दिलेल्या एका मुलाखतीत ऋषभ शेट्टीला 'कंतारा'च्या हिंदी रिमेकबद्दलही प्रश्न विचारण्यात आला होता की, जर त्याचा हिंदी रिमेक बनला, तर त्याला हिंदी सिनेमाच्या रिमेकमध्ये कोणत्या अभिनेत्याला पहायला आवडेल? यासंदर्भात ऋषभने सांगितलं की, त्याला हिंदी रिमेकमध्ये रस नाही.