पतीच्या जाचाला कंटाळून गायिकेची आत्महत्या

सासरकडून हुंड्यासाठी होत असलेल्या अत्याचारामुळे तिने आत्महत्या केली.

Updated: Feb 18, 2020, 02:19 PM IST
पतीच्या जाचाला कंटाळून गायिकेची आत्महत्या  title=

मुंबई : दिवसागणिक कलाकारांच्या आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आता दाक्षिणात्य गायिका सुष्मिताने आत्महत्या केल्याची घटना समोर येत आहे. पतीच्या आणि सासरच्या जाचाला कंटाळून सुष्मिताने आपल्या जीवनप्रवास संपवल्यांचं समोर येत आहे. सुष्मिताने सोमवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सासरकडून हुंड्यासाठी होत असलेल्या अत्याचारामुळे तिने आत्महत्या केली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

आत्महत्येपूर्वी तिने एक नोट लिहिली असून आई आणि भावाला व्हॉट्स अॅपवर व्हॉइस मेसेज पाठवला आहे. 'पती आणि घरातील सदस्य मला त्रास देत आहेत. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मला माफ करा.' अशा आशयाचं मेसेज तिने भाऊ सचिनच्या फोनवर पाठवले होते. 

बंगलुरू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गायिकेने तिच्या मृत्युपत्रात हुंड्यासाठी पती, त्याची बहीण आणि काकी यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे. सचिनला सकाळी साडेपाचच्या दरम्यान सुष्मिताचा मेसेज मिळाल्यानंतर तात्काळ बहिणीच्या घराकडे धाव घेतली. 

सुष्मिताच्या पतिचे नाव शरथ कुमार असे आहे. शरथ एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करतो. सुष्मिताने ‘हलू थूप्पा’ आणि ‘श्रीसमन्या’ या चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. तिच्या आत्महत्येप्रकरणी पोलीस अधिक तपास घेत आहेत.