मुंबई:अभिनेत्री कांगना राणैतचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी' 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. कांगनाने सिनेमाच्या शूटिंगमध्ये तिच्यावर झालेल्या अत्याचारावर आवाज उठवला आहे. पण तिने #Me too मोहीमेची मदत घेतली नाही. कारण झालेले अत्याचार हे शारीरिक नसुन ते अपमानास्पद आणि मानसिक होते. कांगनाने सांगितले अत्याचार कोणत्याही स्तरावर होवू शकतो. तिने तिच्या आयुष्यात अनेक वाईट लोकांचा सामना केला आहे. सेटवर अनेक वेळा अशा अत्याचाराला बळी पडली आहे. कंगनाने सेटवरील काही तिचे अनुभव सांगितले. ' सेटवर मला सहा तास वाट बघायला लावत असे. चुकीची वेळ देवून मला तासंतास वाट बघायला लावयचे. मला नेहमी चुकीच्या गोष्टी सांगायचे कारण मला काढण्यात येईल हा त्यामागचा हेतू होता. त्यानंतर शूटिंग रद्द केली जाई. सिनेमाच्या कार्यक्रमांना मला बोलवायचे नाहीत. सिनेमाचा ट्रेलरही मला न विचारता प्रदर्शित केला.
कांगना राणैतने ‘क्वीन' सिनेमाच्या दिग्दर्शकांविरुद्ध लैंगिक अत्याचाराचे आरोप केलेल्या महिलेचे समर्थन केले. ' सिनेमांचे सेट महिलांसाठी सुरक्षित हवे असेलतर कडक कायदा आणि तात्काळ कारवाई करायला हवी ' #Me too मोहीमेमुळे सिने जगातील पुरुष मंडळी घाबरले आहेत.लोक घाबरली आहेत आणि त्यांनी घाबरलेच पाहिजे.