दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, दीपिका करिना नव्हे तर सितेच्या भूमिकेसाठी कंगना रानौतची वर्णी

पद्मश्री आणि 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे

Updated: Sep 14, 2021, 10:58 PM IST
 दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, दीपिका करिना नव्हे तर सितेच्या भूमिकेसाठी कंगना रानौतची वर्णी title=

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा एकदा 'थलायवी' चित्रपटातील तिच्या अभिनयासाठी दमदार भूमिकेत दिसली आहे. पद्मश्री आणि 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे, तिच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. हा चित्रपट एसएस स्टुडिओ अंतर्गत बनवला जात आहे.

चित्रपट निर्मात्यांनी अधिकृतपणे तिच्या नावाची घोषणा करत सांगितलं आहे की, कंगना रानौत तिच्या आगामी महाकाव्यावर आधारित 'सीता-द अवतार' या आगामी प्रकल्पात सीतेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आलुक्य देसाई करणार आहेत. फिल्ममेकर सलोनी शर्मा म्हणाल्या की, एक महिला म्हणून कंगनाच्या या व्हीएफएक्स मॅग्नम प्रोजेक्टसाठी नाव जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे. कंगना भारतीय स्त्रियांच्या भावना आणि सार दर्शवते. ती निर्भय, आव्हानात्मक आणि धैर्यवान आहे. आता प्रत्येक मार्गाने समानता साजरी करण्याची वेळ आली आहे. चित्रपटाचे लेखक केव्ही विजयेंद्र प्रसाद म्हणाले की, या चित्रपटात 'सीता'ची भूमिका साकारण्यासाठी कंगना ही त्यांची पहिली पसंती होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कंगना रानौतने तिच्या अभिनयाने हे स्पष्ट केलं आहे की, तिला फक्त बॉलिवूडची राणी म्हटलं जात नाही. तर मणिकर्णिका ते थलायवी, धाकड आणि पंगा पर्यंत अनेक चित्रपट करून तिने स्वतःला सिद्ध केलं आहे. ती बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे. लेखक केवी विजयेंद्र प्रसाद यांनी खुलासा केला होता की, 'सीता'ची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्रीची निवड ही दुसरी कोणीही नाही तर कंगना रानौत आहे.