Kangana Ranaut On Ranbir Kapoor: अभिनेत्री आणि विद्यमान खासदार कंगना रणौतने आपल्या एका जुन्या ट्वीटचा संदर्भ देत पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. या ट्वीटमध्ये कंगनाने अभिनेता रणबीर कपूरला 'सिरिअल स्कर्ट चेसर' म्हटलं होतं. आता 'आप की अदालत' या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये अभिनेत्रीने अनेक कलाकारांबद्दल केलेल्या विधानांवर भाष्य करताना दिसत आहेत. प्रामुख्याने रणबीर कपूर आणि चित्रपट निर्माता करण जोहरसंदर्भात केलेल्या विधानांवर कंगनाने भाष्य केल्याचं प्रमोमध्ये दिसत आहे.
रणबीर कपूरविरुद्ध केलेल्या विधानावर कंगनाला 'आप की अदालत'चे सूत्रसंचालक रजत शर्मा यांनी प्रश्न विचारला. त्यावर कंगनाने आधी जोरात हसली. त्यानंतर त्यानंतर ती रजत शर्मा यांना, "तुम्ही तर असं बोलत आहात जसा काही तो स्वामी विवेकानंद आहे," असं म्हणाली. कंगनाने 2020 साली रणबीरविरुद्ध तसेच दिपिका पादुकोणविरुद्ध एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये तिने रणबीरला 'सिरिअल स्कर्ट चेसर' असं म्हटलेलं. तर दीपिकाला टोला लगावताना कंगनाने, 'स्वयंघोषित मानसिक रुग्ण' असं म्हटलेलं.
"रणबीर हा 'सिरिअल स्कर्ट चेसर' आहे. मात्र कोणीच त्याला बलात्कारी म्हणणारी हिंमत करणार नाही. दीपिका ही स्वयंघोषित मानसिक रुग्ण आहे. मात्र कोणीच तिला सायको किंवा हडळ म्हणणार नाही. ही सर्व विशेषणं फक्त बाहेरुन लहान शहरांमधून आणि विनम्र कुटुंबातून आलेल्या (कलाकारांसाठी) वापरली जातात," असं कंगनाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं. खाली पाहा कंगानाची ही पोस्ट ज्याबद्दल तिने आता पुन्हा भाष्य केलं आहे.
कंगनाने अन्य एका पोस्टला रिप्लाय करताना स्टार किड्सवर टीका केली होती. रणबीरने बॉम्बे व्हेलवेट, बदमाश आणि जग्गा जासूससारखे फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर तसेच 'ए दिल है मुश्कील' आणि 'तमाशा'सारखे सर्वसाधारण कमाई चित्रपट केल्यानंतरही त्याला प्रसार माध्यमांकडून पाठिंबा मिळाला. त्याला राज कुमार हिरानींचा 'संजू' (2018) चित्रपटही मिळाला, असं कंगनाने म्हटलं होतं.
जून 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर कंगना सातत्याने स्टार किड्सवर टीका करताना दिसत आहे. यामध्ये आलिया भट, सोनम कपूर आणि अनन्या पांडेसारख्या कलाकारांचा समावेश आहे. एका जुन्या मुलाखतीमध्ये तिने तापसी पन्नू आणि स्वरा भास्करवरही निशाणा साधला होता. कंगना या दोघींना 'बी ग्रेड' अभिनेत्री म्हणाली होती.