Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रानौत (kangana ranaut) कायम तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना नेहमी सामाजिक, राजकीय किंवा इतर मुद्द्यांवर आपलं परखड मत मांडत असते. स्वतः केलेल्या वक्तव्यांमुळे अभिनेत्री अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली. कायम वेग-वेगळ्या कारणांमुळे चर्चेत असणारी कंगना आता ट्विटरमुळे चर्चेत आली आहे. 2021 मध्ये कंगनाचं ट्विटर आकाउंट सस्पेंड (kangana ranaut twitter account suspended) करण्यात आलं. नुकताच अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांना ट्विटरचा मालकी हक्क मिळाल्यानंतर त्याने ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्याबरोबर काही अधिकाऱ्यांना पदावरुन काढण्यात आलं.
एलॉन मस्क यांना ट्विटरचा मालकी हक्क मिळाल्यानंतर कंगनाला तिचं अकाउंट पुन्हा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (kangana ranaut social media) नुकताच कंगना एका कार्यक्रमात उपस्थित होती. यावेळी अभिनेत्रीला ट्विटरचा मालकी हक्क आता एलॉन मस्क यांच्याकडे आहे. त्यामुळे तु ट्विटरवर पुन्हा सक्रीय होऊ शकते का? यावर कंगनाने स्पष्ट उत्तर दिलं. (kangana ranaut twitter followers)
कंगना म्हणाली, 'मी जवळपास एक वर्षासाठी ट्विटरवर होते. ट्विटर मला एक वर्षही सहन करु शकला नाही. त्यानंतर मी इन्स्टाग्रामवर सक्रिय झाले. पण इन्स्टग्रामने देखील मला अनेकदा नोटीस पाठवली. आता माझं अकाउंट माझी टीम सांभाळत आहे. तेव्हापासून काहीही तक्रार नाही.' (kangana ranaut instagram)
पुढे अभिनेत्री म्हणाली, 'मला जर माझे ट्विटरचे अधिकार पुन्हा मिळाले तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात मसाला मिळेल. ट्विटर एक प्रभावी माध्यम आहे. यावर अनेक विषयांवर चर्चा होते. इन्स्टाग्राम फक्त फोटोंसाठी मर्यादित आहे.' असं देखील कंगना यावेळी म्हणाली. (kangana ranaut twitter fight)