हंसल मेहता यांच्या ट्वीटवर कंगनाची रिएक्शन, म्हणाली 'जेव्हा शिवसेनाने मला धमकी दिली होती..'

हंसल मेहता यांनी महाराष्ट्रात वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रकरणात राष्ट्रपती राजवट येणार आहे का? असा सवाल केला. हंसल मेहता यांचे हे ट्विट कंगनाने रीट्वीट करताना म्हटले आहे की

Updated: Apr 9, 2021, 05:12 PM IST
हंसल मेहता यांच्या ट्वीटवर कंगनाची रिएक्शन, म्हणाली 'जेव्हा शिवसेनाने मला धमकी दिली होती..' title=

मुंबई : फिल्ममेकर हंसल मेहताबरोबर अभिनेत्री कंगना रनौतनं ट्विटरवर भांडण केलं होतं. हंसल मेहता यांनी केलेल्या ट्विटवरून या दोघांमध्ये वाद झाला. या ट्विटमध्ये हंसल मेहता यांनी महाराष्ट्रात वाढत्या कोरोना विषाणूच्या प्रकरणात राष्ट्रपती राजवट येणार आहे का? असा सवाल केला. हंसल मेहता यांचे हे ट्विट कंगनाने रीट्वीट करताना म्हटले आहे की, मेहता भी 'भक्त' बन जाएंगे.

खरं तर हंसल मेहता यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "आम्ही लवकरच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झालेली पाहाणार आहोत का?" हंसल मेहता यांच्या या ट्विटवर कंगना रनौतनं प्रतिक्रिया व्यक्त केली आणि लिहिले की, हंसल लवकरच 'संघी' बनणार आहोत. तुमचासुद्धा माझ्यासारख्या लिब्रीजमुळे मोहभंग होईल.

लवकरच हंसल मेहता संघी बनतील
कंगना राणौत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, "आदर्शपणाने आपल्याला वाटलं पाहिजे, हंसल सर खूप लवकरच तुम्हीही संघी व्हाल, तुम्ही एक तर्कसंगत व्यक्ती आहात, जेव्हा तुमचा माझ्यासारख्या या लिब्रीजमुळे मोहभंग होईल तेव्हा तुमच्या मनात कमळ उमलेल आणि तुम्ही एक भक्त व्हाल. मग आपण एकत्र सद्गुरू आश्रम किंवा कैलासच्या यात्रेवर एकत्र जावूया. "

दोघे एकत्र कॉफी पिऊ या
त्यानंतर लगेजच कंगना रनौतच्या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करत हंसल मेहता यांनी कंगनाला सांगितले की, कोरोना विषाणूच्या साथीनंतर आपण एकत्र कॉफी पिवूया. यावर कंगना म्हणाली, "नक्कीच... तुमच्या ह्यूमर आणि तुमच्यासोबतच्या फूडला मी खूप मिस करते"

शिवसेनेने धमकी दिली
कंगनाने पुढे लिहिलं आहे की, "शिवसेनेने मला धमकावल्यावरही त्यांनी माझं रक्षण केलं. मी त्यांना खरं सर्वोच्च स्त्रीवादी आणि बोलण्याचे स्वातंत्र्य आणि उदारमतवादी मूल्ये चँम्पियन म्हणून पाहते आहे ...लवकरच आपल्याला पण विश्वास बसेल... मी कमळाच्या फूलासाठी आयुष्यभर आभारी आहे.