kajol devgan च्या सुपरहिट गाण्यांवर शाळेच्या कार्यक्रमात मुलगी न्यासाचा डान्स , डान्सच्या बाबतीत मुलगी आईपेक्षा कमी नाही

न्यासाने तिच्या शाळेत एका कार्यक्रमात तिची आई काजोलच्या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे. व्हिडिओमध्ये न्यासा आपल्या मित्र-मैत्रिंणीसोबत 'कभी खुशी कभी ग'मधील बोले चुडिया आणि माय नेम इज खानमधील तेरे नैना या गाण्यांवर थिरकताना दिसत आहे. न्यासाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Apr 12, 2021, 05:09 PM IST
kajol devgan च्या सुपरहिट गाण्यांवर शाळेच्या कार्यक्रमात मुलगी न्यासाचा डान्स , डान्सच्या बाबतीत मुलगी आईपेक्षा कमी नाही title=

मुंबई : अभिनेत्री काजोल आणि अजय देवगणची मुलगी न्यासाची फॅन फॉलोइंग एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. न्यासा चाहत्यांना खूप आवडते. सोशल मीडियावर तिच्या नावाची अनेक फॅनपेज आहेत. जिथे तिचे नव-नवीन फोटो कायम व्हायरल होत असतात. स्वत: काजोलने एका मुलाखतीत सांगितले होते की, न्यासा तिला सोशल मीडियावर फोटो शेअर करण्याचा सल्ला देत असते. काजोलप्रमाणेच तिच्या मुलीलाही नृत्याची आवड आहे. नकताच न्यासाचा अक डान्स व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

न्यासाने तिच्या शाळेत एका कार्यक्रमात तिची आई काजोलच्या सुपरहिट गाण्यांवर डान्स केला आहे. व्हिडिओमध्ये न्यासा आपल्या मित्र-मैत्रिंणीसोबत 'कभी खुशी कभी ग'मधील बोले चुडिया आणि माय नेम इज खानमधील तेरे नैना या गाण्यांवर थिरकताना दिसत आहे. न्यासाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहत्यांना न्यासाच्या डान्स खूप आवडला आहे.

व्हिडिओमध्ये, न्यासाने क्रॉप नॉटेड टॉपसोबत स्कर्ट घातला आहे. जब वी मेटमधील नगाडा गाण्यावर काजोलच्या मुलीने शाळेत सोलो डान्स केला आहे. आतापर्यंत नासाचा डान्स व्हिडिओ हजारो लोकांनी पाहिला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nysa devgan  (@nysadevganx)

सोशल मीडियावर न्यासा ट्रोल
न्यासा देवगण काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. लोअर आणि टॉप घालून ती मंदिरात गेली. त्यानंतर ट्रोलर्सने तिच्यावर निशाणा साधला. न्यासावर कपड्यांसंर्दभात सोशल मीडियावर अनेक कमेंन्ट केल्या गेल्या. एकदा न्यासा बराच मेकअप करुन दिवाळी पार्टीत गेली. यावेळीदेखील न्यासाला ट्रोलिंगला सामोर जावं लागवं होतं.

काजोलकडून व्हीडिओ शेअर
काही दिवसांपूर्वी काजोलनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये न्यासाने सांगितले की, ट्रोलिंगला तिला कसा सामना करावा लागतो. तिनं सांगितलं होतं की, अजय देवगणनं ट्रोलर्सला सल्ला देतो.