मॉं कालीच्या हातात सिगारेट, LGBT झेंडा! चित्रपटाच्या पोस्टरवरून मोठं वादंग

 'काली' या डॉक्यूमेंट्री फिल्मच्या पोस्टरवरून मोठा वाद निर्माण झालाय. या

Updated: Jul 4, 2022, 01:57 PM IST
 मॉं कालीच्या हातात सिगारेट, LGBT झेंडा! चित्रपटाच्या पोस्टरवरून मोठं वादंग  title=

मुंबई : भारतीय चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांच्या 'काली' या डॉक्यूमेंट्री फिल्मच्या पोस्टरवरून मोठा वाद निर्माण झालाय. या फिल्मच्या पोस्टरवर  मॉं कालीला सिगारेट ओढताना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हे पोस्टर वादात सापडले असून लीना मणिमेकलाई यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरतेय. 

पोस्टरमध्ये काय? 
लीना मनिमेकलाई यांनी २ जुलै रोजी 'काली' या डॉक्यूमेंट्री फिल्मचे पोस्टर प्रदर्शित केले होते.  या चित्रपटात  मॉं कालीला सिगारेट ओढताना व तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात एलजीबीटी समुदायाचा रंगीत ध्वज दाखवण्यात आला आहे. त्यामुळे या  पोस्टरवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. 

अटकेची मागणी 
सोशल मीडियावर नेटकरी चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांच्यावर संताप व्यक्त करत आहेत.पोस्टरमध्ये निर्मात्यांनी माँ कालीचा अपमान केल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. तसेच लीना मनिमेकलाई यांच्यावर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे आता या प्रकरणी लीना मणिमेकलाई याच्यावर अटकेची मागणी करतायत. ट्विटरवर #arrestleenamanimekalai सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.


 
लीना मनिमेकलाई यांनी तिच्या डॉक्यूमेंट्री फिल्मचे पोस्टर शेअर करताना सांगितले की, तिचा चित्रपट कॅनडा चित्रपट महोत्सवात (रिदम्स ऑफ कॅनडा) लाँच करण्यात आला आहे. ती तिच्या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक होती. मात्र आता पोस्टर प्रदर्षित होता मोठा वाद समोर आला आहे.