मुंबई : तुम्ही जर जस्टिन बीबरचे चाहते असाल, दिल्लीत होणाऱ्या त्याच्या शोची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जस्टिन बीबर, पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार होता आणि दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये परफॉर्म करणार होता. तो सध्यासाठी रद्द करण्यात आला आहे. आता ना जस्टिन बीबर भारतात येणार आहे ना दिल्लीत शो होणार आहे. ही बातमी ऐकल्यानंतर आता सिंगच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून त्यांची निराशा होणार आहे. कारण भारतात जस्टिन बीबरच्या चाहत्यांची कमी नाही.
शो कॅन्सल होण्याची ऑफिशियल अनाउंसमेंट
18 ऑक्टोबर रोजी जस्टिन बीबर दिल्लीत एक शो करणार होता. मात्र आता गायकांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर होणारा 'जस्टिन बीबर जस्टिस वर्ल्ड टूर - इंडिया' नावाचा शो रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हा शो यापुढे पुढील महिन्यात होऊ शकणार नाही. जस्टिनचा भारत दौराच रद्द झाला नाही तर चिली, अर्जेंटिना, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, बहरीन, यूएई आणि इस्रायलचा दौराही रद्द करण्यात आला आहे.
त्याचबरोबर या माहितीसोबत तिकीट रिफंडची माहितीही देण्यात आली आहे. असं सांगण्यात आलं आहे की, ज्यांनी आतापर्यंत या शोची तिकिटं खरेदी केली आहेत त्यांनी कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. कारण प्रत्येकाच्या तिकिटाचे पैसे 10 दिवसांत त्यांच्या खात्यात परत येतील. यासोबतच अचानक झालेल्या गैरसोयीबद्दल खेदही व्यक्त करण्यात आला आहे.
जूनमध्ये पॅरालिझचा झटका आला
जस्टिन बीबरला रामसे हंट सिंड्रोमचा त्रास होता आणि त्यामुळे त्याचा चेहरा अर्धांगवायू झाला होता. कालांतराने त्यांची तब्येत सुधारली आणि त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली झाली, त्यानंतरच या दौर्याचे नियोजन करण्यात आलं, मात्र त्यांचा शो रद्द झाल्याने चाहत्यांची पुन्हा निराशा झाली आहे.