अभिनेता जॉन अब्राहमवर मोठं संकट, चाहत्यांना बसतोय धक्का

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमवर मोठं संकट कोसळलं आहे. 

Updated: Dec 14, 2021, 02:26 PM IST
अभिनेता जॉन अब्राहमवर मोठं संकट, चाहत्यांना बसतोय धक्का title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमवर मोठं संकट कोसळलं आहे. जे ऐकून त्याच्या चाहत्यांना धक्का बसतोय. एखाद्या अभिनेत्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्यांचे सोशल मीडिया अकांऊन्ट, अशातच जॉन अब्राहमचं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आलं आहे. त्याच्या डीपीशिवाय, हॅकर्सनी सोशल मीडियावरील सगळ्या पोस्ट देखील हटवल्या आहेत. ज्यानंतर जॉनचे चाहते खूप नाराज होतायेत.

अचानक फोटो हटवले
जॉन अब्राहम सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो. पण चाहते त्याच्या प्रत्येक पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात आणि आता अभिनेत्याच्या पोस्टमधील सगळे फोटो देखील हॅकर्सने डिलीट केले आहेत.

पाहा जॉन अब्राहमच्या अकाउंटचा स्क्रीनशॉट 
या स्क्रीन शॉटमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की, हॅकर्सनी फक्त जॉनचा डीपीच इंस्टाग्राम अकाउंटवरून काढून टाकला नाही तर त्याच्या सगळ्या पोस्टही काढून टाकल्या आहेत. जॉनची एकही पोस्ट दिसत नाही.

चाहत्यांना बसला धक्का 
जॉन अब्राहम भलेही सोशल मीडियावर फारसा अॅक्टिव्ह नसला तरी तो जेव्हाही त्याचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतो तेव्हा त्याचे चाहते त्याला खूप पसंती देतात. अशा परिस्थितीत त्यांच्या आवडत्या अभिनेत्याचं खातं हॅक करणं चाहत्यांसाठी दु:खापेक्षा कमी नाही.  एका चाहत्याने कमेंट करत लिहीलं की, 'अशीवेळ कुणावरही येवू नये' असं म्हणतं आपलं दु:ख व्यक्त केलयं.