'झुंड' विरूद्ध 'काश्मीर फाईल्स' सिनेमा 'या' वादावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची प्रतिक्रिया

सिनेमाचा प्रत्येकाच्या जीवनावर कळत नकळत परिणाम होत असतो. 

Updated: Mar 17, 2022, 12:35 PM IST
'झुंड' विरूद्ध 'काश्मीर फाईल्स' सिनेमा 'या' वादावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची प्रतिक्रिया title=

मुंबई : 'झुंड', 'पावनखिंड' आणि 'काश्मीर फाईल्स' या सिनेमावरून जो वाद सुरू आहे ते चुकीच्या पद्धतीचं आहे, अशी पहिली प्रतिक्रिया दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिली. मी फक्त झुंडच बघणार असं म्हणणाऱ्या प्रेक्षकांचंही मला पटत नाही. तुम्ही सगळे सिनेमे पाहा. अगदी पावनखिंड आणि काश्मीर फाईल्सही पाहा. 

कोंबड्यांच्या झुंजी लावून दिल्यासारखा हा वाद आहे. त्याला काही अर्थ नाही, असं देखील नागराज मंजुळे म्हणाले. झुंड सिनेमा टॅक्स फ्री व्हावा याकरता मिटिंग घेतली जात असल्याची कोणतीच कल्पना नागराज मंजुळे यांना माहित नसल्याचं सांगितलं जात आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule)

माझ्या प्रेमापोटी देखील झुंड पाहा असं म्हणणाऱ्या लोकांच देखील मला पटत नाही. माझी विनंती आहे, असं काही करू नका. रागाने किंवा माझ्या प्रेमापोटी झुंड पाहा असं अजिबातच म्हणू नका. 

सिनेमा आहे, पाहा, विचार करा, तुमच्या जीवनात त्याचा परिणाम झाला तर चांगलच आहे. सिनेमा चालू राहणारच, दिग्दर्शक घरी राहणार पण तुम्ही सिनेमाबाहेर अशी हाणामारी करणं योग्य नाही, असं मत नागराज मंजुळेने व्यक्त केलंय.