Manisha Rani Health Update : 'बिग बॉस ओटीटी 2' या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री मनीषा राणी ही कायमच विविध कारणांनी चर्चेत असते. सध्या ती 'झलक दिखला जा' या रिअॅलिटी शोमध्ये झळकत आहे. मनीषा ही नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती देत असते. आता तिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मनीषा राणीची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे तिला रुग्णायलात दाखल करण्यात आले.
मनीषा राणी ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिच्या एका फॅनपेजने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मनीषा ही रुग्णालयातील बेडवर झोपल्याचे दिसत आहेत. यात तिच्या हाताला सलाईन लावल्याचे दिसत आहे. तिला रुग्णालयात का दाखल करण्यात आले, तिला कशाचा त्रास झाला, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण तिच्या या फोटोनंतर अनेक चाहते तिची काळजी व्यक्त करताना दिसत आहेत.
मनीषाचा रुग्णालयातील फोटो शेअर करत या फॅन पेजने एक कमेंटही केली आहे. आम्हा सर्वांनाच तुझ्या रोजच्या संघर्षाबद्दल माहिती आहे. झलक दिखला जा या कार्यक्रमात तू तुझे सर्वोत्तम दिले आहेस. तू शारिरीकरित्या फार कमजोर झाली आहेस. पण आम्हाला माहितीये की तू लवकरच परतशील. कारण आम्ही तू 12 ते 15 तास रिहर्सलसाठी करत असलेली मेहनत पाहिली आहे. लवकर बरी हो मनीषा राणी, असे या फॅन पेजने म्हटले आहे.
मनीषा राणीचा हा फोटो पाहिल्यावर अनेकजण तिला लवकरात लवकर बरं होण्यासाठीच्या सदिच्छा देत आहेत. सध्या मनीषा ही झलक दिखला जा या कार्यक्रमातद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती अनेक तास तिच्या कार्यक्रमासाठी रिहसर्ल करत आहे. यामुळेच तिच्या तब्येतीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. पण अद्याप याची माहिती समोर आलेली नाही. मनीषाचा हा फोटो पाहिल्यावर ती 'झलक दिखला जा' या कार्यक्रमात पुन्हा परतणार की नाही, याबद्दलही शंका व्यक्त केली जात आहे. पण तिचे चाहते ती लवकरात लवकर बरी व्हावी आणि कार्यक्रमात परतावी, यासाठी प्रयत्न करत आहे.