अनूप जलोटांची 'गर्लफ्रेंड' जसलीन पुन्हा चर्चेत

वयाच्या १६ वर्षी जसलीनने कॉलेजमध्ये बेस्ट फिमेल सिंगरचा पुरस्कार पटकावला होता.

Updated: Apr 5, 2019, 12:06 PM IST
अनूप जलोटांची 'गर्लफ्रेंड' जसलीन पुन्हा चर्चेत  title=

नवी दिल्ली : टेलिव्हिजन विश्वातील सर्वात विवादित शो 'बिग बॉस'ची मागील सीजनमधील स्पर्धक जसलीन मथारूने गुरूवारी आपला वाढदिवस साजरा केला. 'बिग बॉस १२'ची स्पर्धक जसलीन संपूर्ण शोदरम्यान चांगलीच चर्चेत होती. मागील सीजनमध्ये अनूप जलोटा आणि जसलीनच्या अफेअरची खूप चर्चा झाली. अनूप जलोटा आणि जसलीनच्या नात्यामुळे सर्वच प्रेक्षकांना मोठा धक्का बसला होता. जसलीनने नुकताच २८ वा वाढदिवस साजरा केला. जसलीनने तिच्या वाढदिवसाच्या पार्टीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या तिच्या फोटोजमुळे जसलीन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

पंजाबी परिवारातून आलेल्या जसलीनचा जन्म ४ एप्रिल १९९० साली मुंबईत झाला. लहानपणापासून संगीताची आवड असणाऱ्या जसलीनने संगीताचं शिक्षण घेण्यास सुरूवात केली. वयाच्या १६ वर्षी जसलीनने कॉलेजमध्ये बेस्ट फिमेल सिंगरचा पुरस्कार पटकावला होता. जसलीनने अनेक नामवंत कलाकरांसोबत काम केलं आहे. मीका सिंह, सुखविंदर सिंह, अमजद खान यांसारख्या गायकांसोबत तिने स्टेज शेअर केला आहे. 

 
 
 
 

A post shared by Jasleen Matharu (@jasleenmatharu) on

'बिग बॉस १२' मधून जसलीन सर्वात चर्चेत आली. या शोमध्ये जसलीनचं नाव भजन सम्राट अनूप जलोटा यांच्यासोबत जोडण्यात आलं होतं. जसलीन 'बिग बॉस १२'मध्ये अनूप जलोटा यांची गर्लफ्रेंड बनून शोमध्ये दाखल झाली होती. अनूप जलोटा आणि जसलीनची जोडी या शोसह संपूर्ण देशातच चर्चेचा विषय बनला होता. अनूप जलोटा आणि जसलीन यांच्यातील ३७ वर्षांचे अंतरच खरा चर्चेचा विषय झाला होता. परंतु त्यानंतर काही दिवसांतच या दोघांच्या नात्याबाबत खुलासा करण्यात आला.

जसलीन शोबाहेर आल्यानंतर अनूप जलोटा आणि माझं रिलेशनशिप हे एक प्रॅन्क असल्याचं तिनं म्हटलं. या प्रॅक्नने आम्हा दोघांनाही खूप प्रसिद्ध केलं. परंतु नंतर हा प्रॅन्क फेल झाला. शोची थिम एक जोडी असल्याने मीच अनूप जलोटा यांना माझ्यासोबत शोमध्ये सामील होण्यास सांगितलं होतं. मात्र आमची गुरू-शिष्याची जोडी होती. परंतु मीच अनूप आणि मी गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं. मात्र नंतर हाच प्रॅन्क माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर भारी पडला असल्याचं तिनं सांगितलं. 

जसलीन गायिका तसेच अभिनेत्रीही आहे. जसलीनचे वडिल केसर मथारू दिग्दर्शक आहेत. जसलीनने द डर्टी रिलेशन (२०१३) आणि द डर्टी बॉस (२०१६) या चित्रपटात काम केलं आहे. दोन्ही चित्रपटांचं दिग्दर्शन केसर मथारू यांनी केलं आहे.