जान्हवी कपूरच्या या साडीची किंमत माहिती आहे का?...साडीच्या किंमतीत येईल गाडी

अभिनेत्री जान्हवी कपूरने तिचे साडीतले काही फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.  या साडीची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही.

Updated: May 5, 2022, 08:21 AM IST
जान्हवी कपूरच्या या साडीची किंमत माहिती आहे का?...साडीच्या किंमतीत येईल गाडी  title=

मुंबईः अभिनेत्री जान्हवी कपूर ही वेस्टर्न असो किंवा इंडियन, प्रत्येक पोशाखात ती सुंदर दिसते. नेहमीच बोल्ड अंदाजात फोटो शेअर करणाऱ्या जान्हवी कपूरने साडीत फोटो शेअर केला तेव्हा तिचे चाहते आश्चर्यचकीत झाले. जान्हवी कपूरने तिचे साडीतले काही फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले तेव्हा त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

जान्हवी कपूरने इंस्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या साडीतील लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचे सौंदर्य खुलून दिसत आहे. मोकळे केस, गुलाबी कानातले आणि हिरव्या साडीतील जान्हवीचा लूक तिच्या चाहत्यांना घायाळ करतो आहे. जान्हवीने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताच ते वेगाने व्हायरल होत आहे. .

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

मात्र जर तुम्हालाही जान्हवी कपूरची ही साडी आवडली असेल आणि तुम्हाला ती तुमच्या वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करायची असेल, तर तुम्हाला त्यासाठी तब्बल 70 हजार रुपये मोजावे लागतील... होय, ही सुंदर साडी डिझायनर अनिता डोंगरे यांच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, ज्याची किंमत एकूण 70 हजार रुपये आहे.

जान्हवी कपूरने साडी नेसण्याची ही पहिलीच वेळ नाही, तर यापूर्वीही ती डिझायनर साडीत व्हायरल होताना दिसली आहे. आणि प्रत्येक वेळी तिची स्टाइल सरस होती.. कधी लाल तर कधी पिवळ्या साडीत जान्हवी आणखीनच सुंदर दिसत आहे.