मुंबई : भारतात सध्याच्या घडीला प्रचंड हिंसा, मतभेद आणि अशांततेचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक वाद, संसदेतील गदारोध आणि प्रचंड विरोधामध्येच लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAAचे पडसाद सर्वत्र पाहायला मिळत आहेत. देशाच्या राजधानीतही या विरोधनाने हिंसेचं वळण घेतलं असून अनेक ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं आहे.
CAA नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्यावरुन jamia millia islamia जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला लाठीमार आणि एकंदरच परिस्थितीवर कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी खुलेपणाने आपली मतं मांडली आहेत. त्यातच आता नवा वाद डोकं वर काढण्याची शक्यता असल्याचं चित्र दिसत आहे. एकिकडे अनेक कलाकारांना जामिया हिंसाचार प्रकरणात विद्यार्थ्यांची बाजू घेतलेली असतानाच दुसरीकडे अभिनेता अक्षय कुमार याने सोशल मीडियावर जामिया.... विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर करण्यात आलेल्या हल्ल्याची थट्टा उडवणाऱ्या एका व्हिडिओला लाईक केल्याचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्याचं म्हटलं गेलं.
Regarding the ‘like’ on the tweet of Jamia Milia students, it was by mistake. I was scrolling and accidentally it must have been pressed and when I realised I immediately unliked it as In no way do I support such acts.
— Akshay Kumar (@akshaykumar) December 16, 2019
I have immense respect for Akshay Kumar. It must be extremely difficult to be trained in Martial Arts with a spine missing. https://t.co/J5Cwk3hyHY
— Keyur (@Keyuratedtweets) December 16, 2019
सोशल मीडियाच्या विश्वात हा स्क्रीनशॉट वणव्यासारख्या पसरला. ज्यानंतर अनेकांनीच खिलाडी कुमारवर तोफ डागली. इतकच नव्हे, तर #BoycottCandianKumar असं म्हणतही त्याच्यावर बंदी आणण्याची मागणी केली. आपल्याविषयी सुरु असणाऱ्या या चर्चा पाहता अक्षयने लगेचच ट्विट करत आपल्याकडून चुकून ते ट्विट लाईक केलं गेल्याचं त्याने म्हटलं.
So this is what @anuragkashyap72 has to say about @akshaykumar pic.twitter.com/3nFPLB62Hp
— sameet (@thakkar_sameet) December 16, 2019
Absolutely https://t.co/cHArbBPV2M
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) December 16, 2019
हे सर्व घडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एक स्क्रीनशॉट व्हायरल झाला, ज्यामध्ये या मुद्द्यावरुन खिलाडी कुमारची खिल्ली उडवणारं ट्विट दिग्दर्शक अनुराग कश्यपने लाईक आणि रिट्विट केल्याचं पाहायला मिळालं. याचविषयी ज्यावेळी नेटकऱ्यांनी थेट अनुरागच्याच भूमिकेविषयी स्पष्टता विचारली तेव्हा त्याने आपली भूमिका स्पष्ट करत पाहा अनुराग अक्षय कुमारविषयी काय विचार करतो या ट्विटवर, 'अर्थात....' इकत्याच शब्दात उत्तर दिलं. तेव्हा आता यावर खिलाडी कुमार कसा व्यक्त होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.