रेकॉर्डब्रेक गाजणारा 'जय भीम' मोठ्या अडचणीत; जाणून घ्या यामागचं कारण

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील एका दृश्याची बरीच चर्चा झाली.   

Updated: Nov 17, 2021, 02:36 PM IST
रेकॉर्डब्रेक गाजणारा 'जय भीम' मोठ्या अडचणीत; जाणून घ्या यामागचं कारण  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जय भीम' (Jai Bheem) या चित्रपटाच्या नावे आता नव्या वादानं डोकं वर काढलं आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील एका दृश्याची बरीच चर्चा झाली. 

दृश्यामध्ये अभिनेता प्रकाश राज साकारत असणारं पात्र हिंदीमध्ये बोलणाऱ्या एका व्यक्तीच्या कानशिलात लगावताना दिसत आहे. 

आता म्हणे वन्नियार संगम (Vanniyar community notice to Jai Bheem) या समाजाकडून चित्रपट निर्मात्यांना अब्रूनुकसानीचा दावा करणारी नोटीस बजावण्यात आली आहे. 

नोटीस बजावण्यासोबतच 5 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचीही मागणी करण्यात आली आहे. 

वन्नियार संगमच्या प्रदेशाध्यक्षांनी या समाजाती अब्रू आणि प्रतिमा मलिन करणाऱ्या दृश्चांचा चित्रपटात जाणीवपूर्वक समावेश करण्यात आला आहे असा आरोप केला आहे. 

नोटीसमध्ये सदर दृश्यांचा उल्लेखही करण्यात आला आहे. जिथे वन्नियार समाजाचं प्रतिक असणारं 'अग्निकुंड' दाखवण्यात आलं आहे. 

पाठवण्यात आलेल्या कायदेशीर नोटीसमध्ये वन्नियार समाजाच्या प्रदेशाध्यक्षांनी अशी सर्व दृश्य हटवण्याची मागणी केली जी समाजाची प्रतिमा मलिन करत आहेत. 

वाद्ग्रस्त दृश्य हटवण्यासोबतच 7 दिवसांमध्ये 5 कोटी रुपयांची नुकसानभरपाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

काही दिवसांपूर्वीच Amazon Prime या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. अभिनेता सूर्या यानं चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिका साकारली आहे, ज्याचं अनेकांनीच कौतुक केल्याचं पाहायला मिळत आहे.