Netizens slams Salman Khan over Isha Malviya's intimate video : 'बिग बॉस' म्हटलं की त्यातून निघणाऱ्या अनेक कॉन्ट्रोव्हर्सी या चर्चेत असतात. या शोचं आता 17 वं पर्वं सुरु आहे. नेहमीच म्हटलं जातं की हा शो फॅमिली शो आहे. मात्र, प्रत्येक सीझनमध्ये असं काही होतं की नक्की का फॅमिली शो आहे ना असा प्रश्न उपस्थित राहतो. असाच काहीसा प्रकार आता झाला आहे. समर्थ जुरेल आणि ईशा मालवीयचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांना लाज वाटत असल्याचं म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
'बिग बॉस' चा सुत्रसंचालक सलमान खान नेहमीच या कार्यक्रमाला फॅमिली शो असं म्हणतो. जेव्हा ओटीटीवर हा शो टेलिकास्ट करण्यात आला तेव्हा सलमाननं सांगितलं होतं की हा शो फॅमिली शो राहिल याची तो काळजी घेईल की या शोमध्ये कोणताही स्पर्धक सीमा ओलांडणार नाही किंवा शिव्या देणार नाही. मात्र, 'बिग बॉस 17' मध्ये काही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. या शोमध्ये यावेळी स्पर्धकांमध्ये असलेली स्पर्धा पाहायला मिळाली नाही तर पती-पत्नीची असलेली भांडण पाहायला मिळाली असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. त्यानंतर आता बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडमधील भांडण पाहायला मिळत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत.
Nibba Nibbi Bigg Boss ko ab kuch aur hi show banate hue.@BeingSalmanKhan bhai ye aapka family show.pic.twitter.com/awppfnJqKo
— #BiggBoss_Tak (@BiggBoss_Tak) November 4, 2023
हेही वाचा : लोकप्रिय अभिनेता 54 वर्षं लहान गर्लफ्रेंडला देणार दर महिना 25 लाख रुपये; उचलणार मुलाचा संपूर्ण खर्च
How shameless can this 19 year old get #BB17 #BiggBoss17
— Shreya(@shreyasharmaa13) November 4, 2023
समर्थनं आल्यानं या शोचं संपूर्ण वातावरण बदलल्याचं म्हटलं जात आहे. ईशाच्या स्वभावात अचानक झालेले हे बदल अनेकांना कळत नाही आहे. समर्थ येण्याआधी पर्यंत ईशा अभिषेकसोबत असायची. पण जेव्हा समर्थची एन्ट्री झाली तेव्हा तो तिचा बॉयफ्रेंड आहे असं तिनं मान्य केलं नाही. पण त्यानंतर काही काळ जाताच तिनं मान्य केलं की समर्थ तिचा बॉयफ्रेंड आहे. त्यानंतर ते दोघं सगळ्यांसमोर एकत्र राहू लागले इतंकच नाही तर रोमान्स देखील करू लागले. पण आता त्यांचा रोमान्स प्रेक्षकांना आवडला नाही. समर्थ आणि ईशा या दोघांनी सगळ्या हद्द पार केल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून इतकं स्पष्ट झालं आहे. ही पहिली वेळ नाही जेव्हा ईशा आणि समर्थचा असा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या आधी देखील त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत ही लाजिरवानी गोष्ट असल्याचे म्हटले आहे. इतकंच नाही तर त्या दोघांना शोमधून बाहेर काढा असं म्हटलं आहे.