मुंबई : कॉमेडियन भारती सिंग लवकरच आई होणार आहे. गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांतही भारती जिद्दीने काम करत आहे. कॉमेडियन एक नाही तर अनेक टीव्ही शोमध्ये एकत्र काम करताना दिसत आहे. भारती सिंगने नुकतंच मुलाखतीदरम्यान तिच्या प्रेग्नेंसीबाबत अनेक खुलासे केले आहेत. कॉमेडियननेही तिच्या जुळ्या मुलांच्या अफवांवर आता प्रतिक्रिया दिली आहे.
दिलेल्या एका मुलाखतीत भारती सिंगने जुळ्या मुलांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. कॉमेडियनला मुलाखतीदरम्यान विचारण्यात आलं की, 'तुम्हाला असं वाटतं का की, तुम्हाला जुळी मुलं होणार आहेत का?' यानंतर कॉमेडियन आणि हर्ष लिंबाचिया म्हणाले, 'नाही आम्हाला जुळी मुलं होणार नाहीत.' मुलाखतीदरम्यान बोलताना भारती म्हणाली, 'आम्हाला एकच मूल होईल, आणि त्यातही मला माहित नाही की, बाबा की बेबी आहे. हर्षला
लहान मुलं खूप आवडतात, आम्ही खूप उत्साही आहोत.
भारती सिंह या मुलाखतीत पुढे म्हणाली की, 'ती अनेकदा हर्षला विचारते की तो बाळाच्या प्रेमात कधी पडेल. यावर लोकांचं उत्तर, बाळ हातात आल्यावर होईल असं असतं. आता कधी हातात येतय याची आम्ही वाट पाहत आहोत. भारती सिंहने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला पहिले अडीच महिने तिच्या प्रेग्नेंसीबद्दल माहिती नव्हती.
याचबरोबर अतिशय गंमतीशिर पद्धतीने भारती पुन्हा म्हणाली की, जाड लोकांना समजतचं नाही की आपण प्रेग्नंट आहोत. पुढे भारती म्हणाली की, जेव्हा मी टेस्ट करुन बाहेर आली तेव्हा मला टेस्टिंग किटवर दोन लाईन दिसल्या, हे पाहून आमच्यासाठी सरप्राईजच होतं.