इरफान खानला 'हा' गंभीर दुर्मिळ आजार

अखेर इरफान खान यांनी ट्विट केलं. 

Dakshata Thasale Updated: Mar 16, 2018, 04:48 PM IST
इरफान खानला 'हा' गंभीर दुर्मिळ आजार title=

मुंबई : अखेर इरफान खान यांनी ट्विट केलं. 

गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेता इरफान खान याला कोणता आजार झाला आहे. याची भरपूर चर्चा होती. इरफान खान यांनी आपल्याला गंभीर आजार झाल्याच सांगून देवाकडे प्रार्थना करण्यास चाहत्यांना सांगितलं. तेव्हापासून भरपूर चर्चांना उधाण आलं होतं. पण अखेर इरफान खान यांच्या ट्विटमुळे या चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. 

इरफान खानला झाला हा भयंकर आजार 

खुद्द इरफाननेच ट्विट करत त्याला झालेल्या आजाराविषयी माहिती दिली आहे. इरफान खानला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर neuroendocrine tumour झाल्याचं निदान झालं आहे. न्युरो इंडोक्राइन ट्युमर नावाचा आजार इरफानला झाला असून उपचारासाठी तो लवकरच परदेशात जाणार आहे. न्युरो इंडोक्राइन ट्युमर म्हणजे मज्जासंस्था आणि हार्मोन्स यांच्या पेशींमधून गाठ तयार होते. याच आजाराने इरफानला ग्रासलं आहे. 

'अनपेक्षित घटना आपल्याला मोठं व्हायला मदत करतात. गेले काही दिवस हिच स्थिती होती. न्युरो इंडोक्राइन ट्युमर झाल्याचं माहिती होणं हे माझ्यासाठीही तितकंच कठीण होतं. असं त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. इकफान खानच्या पहिल्या ट्विटनंतर इरफानची जवळची मैत्रिण आणि पत्नी हिने देखील त्याला गंभीर आजार झाल्याचं स्पष्ट केलं. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पण चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.