Munawar Faruqui : 'बिग बॉस 17' विजेता मुनव्वर फारुकीसोबत चुकीची वागणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. जेव्हा इफ्तारी पार्टीसाठी मुनव्वर एका रेस्टॉरंटमध्ये गेला तेव्हा त्या रेस्टॉरंटचे मालक आणि तिथल्या स्टाफनं त्याच्यावर अंडी फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुनव्वर संतापला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात त्याच्या आजुबाजूला खूप गर्दी असल्याचे पाहायला मिळाले आहे.
मुंबईच्या मोहम्मद अली रोडला हा प्रकार घडला आहे. रिपोर्ट्सनुसार, रेस्टॉरंटचे मालकानं मुनव्वरला इफ्तार पार्टीसाठी बोलावलं होतं. पण मुनव्वर दुसऱ्या कोणत्या रेस्टॉरंटमध्ये गेला. त्यामुळे रेस्टॉरंटच्या मालकाला राग आला आणि त्यानं त्याच्या पाच स्टाफ मेंबर्ससोबत मुनव्वरवर अंडी फेकण्यास सुरुवात केली. असं म्हटलं जातं की रेस्टॉरंटचे मालक आणि त्यांच्या स्फाटला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा : तुझ्या भोळ्या नवऱ्याची फसवणूक का केलीस? नेटकऱ्याच्या प्रश्नावर समांथाचं सडेतोड उत्तर
या घटनेनंतर मिनार मस्जिद परिसरात गोंधळ उडाला होता. मुनव्वर देखील यावेळी संतापल्याचे पाहायला मिळत होतं. आता मुनव्वरच्या बाजूनं या प्रकरणात कोणतही स्टेटमेंट समोर आलेलं नाही किंवा त्यानं सोशल मीडियावर काही म्हटलेलं नाही. मुनव्वर विषयी काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती की एका हुक्काबारमध्ये पडलेल्या रेड दरम्यान, पोलिसांनी त्याला इतर सात लोकांसोबत अटक केली होती. चौकशी केल्यानंतर त्याला सोडण्यात आलं. त्यानंतर एल्विश यादवची एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती. एल्विशनं ट्विटरवर म्हटलं होतं की "बिग बॉस विजेता ठरल्यानंतर सगळ्यांचा वाईट काळ सुरु होतो का?"
दरम्यान, बिग बॉसमध्ये आल्यानंतर मुनव्वरचं खासगी आयुष्य चर्चेत आलं होतं. मात्र, विजेता ठरल्यानंतर तो कायदेशीर अडचणीत अडकल्याचे दिसू लागले. तर दुसरीकडे एल्विश देखील विजेता ठरल्यानंतर तो देखील कायदेशीर कारवाईत अडकला आणि तुरुंगवास भोगून आता बाहेर आला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची पोस्ट चर्चेत आहे. तर 2021 मध्ये मुनव्वर इंदोरच्या सेंट्रल जेलमध्ये महिन्याभरापेक्षा जास्त काळ राहिला होता. त्यावर हिंदू कम्यूनिटीच्या भावना दुखावल्याचा आरोप होता.