मुंबई : जगभरात लोकप्रिय ठरलेली सिरीज म्हणजे 'गेम ऑफ थ्रोन्स'. यातील अभिनेता किट हॅरिंगटनने आपली को-स्टार लेसलीसोबत लग्न केलं आहे. या दोघांनी शनिवारी हा सुंदर लग्न केलं आङे. हॅरिंगटन आणि लेसली गेल्या 2012 पासून एकमेकांना डेट करत होते. या दोघांची ओळख गेम ऑफ थ्रोन्सच्या अगोदर एका शो दरम्यान झाली होती.
या शोमध्ये दोघांनी 'जॉन स्नो' 'यग्रीट'अशा प्रेमी जोड्याची भूमिका साकारली होती. या भूमिका जगताना किट व रोज कधी प्रेमात पडले, ते त्यांचे त्यांनाच कळले नाही. गेल्यावर्षी किट व लेसली यांचा साखरपुडा झाला होता. तूर्तास किट व लेसली यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.हँरिंगटन - लेसलीने आपला विवाहसोहळा स्कॉटलँडच्या एबरडीन इथे केला आहे. या लग्नाला गेम ऑफ थ्रोन्सचे सगळे को - स्टार आणि हॉलिवूडमधील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते. एवढंच काय तर या दोघांच्या चाहत्यांनी देखील खास उपस्थिती लावली होती.