थिएटरबाहेर 'झुंड'च्या टीमचा कल्ला, नागराज यांच्या हलगीवर आर्ची-परश्यानं धरला ठेका

नागराज यांच्यासोबत या सिनेमात आर्ची आणि परशा देखील झळकत आहेत.

Updated: Mar 4, 2022, 08:06 PM IST
 थिएटरबाहेर 'झुंड'च्या टीमचा कल्ला, नागराज यांच्या हलगीवर आर्ची-परश्यानं धरला ठेका title=

अरुण म्हेत्रे, झी मीडिया, पुणे : बॉलिवूडमध्ये सध्या एका सिनेमाची सर्वाधिक चर्चा होत आहे. तो सिनेमा म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला 'झुंड'..

मराठी सिनेइंडस्ट्रीला सैराट सारखा हिट सिनेमा दिल्यानंतर दिग्दर्शक नागराज मुंजळे काही तरी मोठं करण्याचा विचार करत होते. आणि अखेर त्यांचा हा बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे.

नागराज यांच्यासोबत या सिनेमात आर्ची आणि परशा देखील झळकत आहेत. आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरुचा अगदी साधा भोळा लूक करण्यात आला आहे. तर परशा देखील पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनं जिंकण्यासाठी सज्ज आहे. या सिनेमाचं खास आकर्षण ठरतोय तो बिग बींची सिनेमातील भूमिका...

गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असलेला हा सिनेमा आता बॉक्स ऑफिसवर दाखल झाला आहे. नुकताच नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड'चा प्रीमियर शो पुण्यातील सिटी प्राईडमध्ये पार पडला आहे.

यानिमित्ताने नागराज यांच्यासह चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी थेट थिएटरमध्ये पोहोचली. कलाकारांसोबतच या चित्रपटाचे संगीतकार अजय अतुल देखील उपस्थित होते.

याठिकाणी त्यांनी जबरदस्त ड्रम वाजवून उपस्थितांना ताल धरायला भाग पाडलं. या कलाकारांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली.