भर सोहळ्यात ऐश्वर्याने अभिषेकसोबत असं काय केलं? की सगळे पाहतच राहिले

ऐश्वर्या राय अशी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जिला लोक तिच्या स्टाईल, फॅशन आणि दमदार अभिनयासाठी ओळखतात. 

Updated: Feb 17, 2022, 03:45 PM IST
 भर सोहळ्यात ऐश्वर्याने अभिषेकसोबत असं काय केलं? की सगळे पाहतच राहिले title=

मुंबई : ऐश्वर्या राय अशी एक बॉलिवूड अभिनेत्री आहे जिला लोक तिच्या स्टाईल, फॅशन आणि दमदार अभिनयासाठी ओळखतात. त्याच वेळी तिचे सुंदर निळे डोळे तिची मोहकता वाढवतात.

ऐश्वर्या राय सध्या फॅमिली फोटो शेअर करताना दिसत आहे, तर तिचे फॅन पेजही सतत अपडेट शेअर करत आहेत. त्याचवेळी, अलीकडेच ऐश्वर्या रायच्या फॅन पेजवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाआहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये ऐश्वर्या पती अभिषेकसोबत डान्स करताना दिसत आहे.

 या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या राय पती अभिषेक बच्चनसोबत तिच्या गुरु चित्रपटातील तेरे बिना गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात ऐश्वर्या आणि लाल रंगाच्या सूटमध्ये अभिषेक आपल्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

 दोघांची केमिस्ट्री पाहून सगळेच त्यांच्या प्रेमात पडले आहेत. ऐश्वर्या रायच्या कामाबद्दल सांगायचे तर, ती सध्या साऊथच्या 'पोनियाम सेल्वन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिची दुहेरी भूमिका असल्याचं बोललं जात आहे.