प्राणप्रतिष्ठेच्या निमीत्ताने उर्फी जावेदने केली खास पूजा; पाहा व्हिडीओ

सध्या सगळा देश रमाच्या भक्ती भावात तल्लीन झाला आहे. सगळीकडे राममय वातावरण झाल्याचं दिसत आहे. असं असताना आता उर्फी जावेदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. 

Updated: Jan 22, 2024, 01:05 PM IST
प्राणप्रतिष्ठेच्या निमीत्ताने उर्फी जावेदने केली खास पूजा; पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सध्या संपुर्ण देश राममय झाला आहे. या भव्यदिव्य सोहळ्याचे केवळ अयोध्यामध्येच नव्हेतर सगळ्या जनतेमध्ये हा रामसोहळा साजरा केला जातोय. मुख्य म्हणजे या सोहळ्याची क्रेझ लहान मुलांमध्येही पहायला मिळत आहे. हा सोहळा आज प्रत्येकजण घरा-घरांत दिवाळीप्रमाणे हा सोहळा साजरा करत आहेत. आज अयोध्येत भगवान श्री रामाचा प्राण प्रतिष्ठासोहळा सुरु असून  हे मंदिर सामन्य जनतेसाठी खुले होणार आहे. या भव्यदिव्य सोहळ्याला केवळ राजकिय नेतेच नाहीतर सेलिब्रिटीदेखील हजर होते. तर अनेक सेलिब्रिटी त्यांच्या सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहेत. मात्र आता अशा अभिनेत्रीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
 
उर्फी जावेदचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आम्ही तुम्हाला सांहतो की, समोर आलेल्या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, उर्फी एका पंडितसोबत बसून होम हवन करताना दिसत आहे. या दरम्यान अभिनेत्रीने निळ्या रंगाचा खूप सुंदर ड्रेस परिधान केला आहे. यावेळी उर्फी सिंपल अंदाजात खूपच सुंदर दिसत आहे. सध्या या व्हिडीओचं सगळीकडून कौतूक होत आहे.

उर्फी जावेद जरी उर्फी जावेदचा धर्म मुस्लिम असला तरी तिची हिंदू धर्मावर प्रचंड श्रद्धा आहे आणि याशिवाय ती अनेकदा मंदिरात जाऊन पूजाही करताना दिसते. एवढंच नव्हेतर ती गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मंदिरात जाऊन पूजा करते. आता उर्फी जावेदचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तिचे चाहते यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. तर अनेकांनी तिला ट्रोलही केलं आहे. 
                              
अनेकांनी या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका युजर्सने म्हटलंय, कंफ्यूज आहे की, हिंदू आहे की, मुस्लिम. तर अजून एकाने कमेंट करत लिहीलंय, आपल्यासा प्रत्येक धर्माला मानलं पाहिजे, जसं उर्फी जावेद मानत आहे. तर अजून एकाने लिहीलंय, बाकी सगळं ठिक आहे. मात्र कपडे जर भगव्या रंगाचे असते तर आम्हाला अजून छान वाटलं असतं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवर युजर्स लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. आत्तापर्यंत या व्हिडीओला  30000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. आणि त्यांचा हा व्हिडिओ सतत व्हायरल होत आहे. उर्फी जावेदला अनेकदा बोल्ड आणि विचित्र कपडे परिधान केल्याबद्दल ट्रोल केलं जातं पण आता तिच्या या कृतीने लोकं तिचे फॅन्स बनले आहेत.