हिंदी सिनेमांमध्ये मराठी कलाकारांचा डंका, या सिनेमांमध्ये पाहायला मिळणार मुख्य भुमिकेत

चक्की चित्रपटात मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिची प्रमुख भूमिका आहे. ती बॉलीवूडमध्ये कशी कामगिरी करते याकडे मराठी सिनेरसिकांचे लक्ष लागलेले आहे

Updated: Sep 26, 2022, 08:01 PM IST
हिंदी सिनेमांमध्ये मराठी कलाकारांचा डंका, या सिनेमांमध्ये पाहायला मिळणार मुख्य भुमिकेत title=

Marathi Artist in Bollywood: ऑक्टोबर महिन्यात दोन नवेकोरे चित्रपट येऊ घातले आहेत. या दोन्ही चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे यात मराठी कलाकारांची महत्वाची भूमिका असणार आहे. पहिला चित्रपट आहे तो म्हणजे 'चक्की' 7 ऑक्टोबर 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपट समीक्षत तरण आदर्श यांनी या चित्रपटाचे पोस्टर कू या स्वदेशी सोशल मीडिया अॅपवर  शेअर केले आहे. पोस्टरच्या वरच्या बाजूला चित्रपटाचा नायक आणि नायिका या दोघांची नावे लिहिलेली पाहायला मिळतायत. पोस्टरमध्ये भोपाळमधील विजेचे बिल दाखवण्यात आले असून, पोस्टरवरून हा चित्रपट विनोदी धाटणीचा असावा असे वाटत आहे. 

Koo App
’CHAKKI’ ON 7 OCT 2022... #UmeshShukla - director of #OMG: #OhMyGod and #102NotOut - presents #Chakki... Stars #RahulBhat and #PriyaBapat… Directed by #SatishMunda… Produced by #BharatNinderwal... #ShiladityaBora’s #PlatoonDistribution to release in cinemas on 7 Oct 2022. #Chakki has music by #IndianOcean… Lyrics by #PiyushMishra and #VarunGrover.

- Taran Adarsh (@taran_adarsh) 22 Sep 2022

चक्की चित्रपटात मराठी अभिनेत्री प्रिया बापट हिची प्रमुख भूमिका आहे. ती बॉलीवूडमध्ये कशी कामगिरी करते याकडे मराठी सिनेरसिकांचे लक्ष लागलेले आहे. यानंतर येणारा चित्रपट म्हणजे 'कोड नेम- तिरंगा'. या चित्रपटात एका मोठ्या ब्रेकनंतर परिणिती चोप्रा आपल्याला बघायला मिळणार आहे. हार्डी संधू याचीही या चित्रपटात भूमिका असून हा चित्रपट 14 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मराठी अभिनेता शरद केळकर हा देखील प्रमुख भूमिकेत असून, चित्रपटाच्या ट्रेलरवरून तो खलनायकी भूमिका साकारत असावा, असे वाटते आहे. 

तरण आदर्श यांनी 14 ऑक्टोबर रोजीच प्रदर्शित होणाऱ्या आणखी एका चित्रपटाचा ट्रेलर कू वर पोस्ट केला आहे. 'डबल XL' असं या चित्रपटाचं नाव असून लठ्ठपणाकडे झुकणाऱ्या दोन तरुणींची यात कहाणी दाखवण्यात आली आहे. हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांची या चित्रपटात मुख्य भूमिका असून या दोघींनीही अनेकदा बॉडी शेमिंगविरोधात आपली मते परखडपणे मांडली आहेत. या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर 'कोड नेम-तिरंगा'सोबत मुकाबला होणार आहे, यामध्ये कोण कोणावर भारी पडतं ते पाहणं उत्सुकतेचे ठरेल.