मुंबई : दिग्गज फिल्म मेकर मणिरत्मन यांना चेन्नईच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक अभिनेता आणि दिग्दर्शक मणिरत्नम यांना भेटण्यासाठी रूग्णालयात गेले आहेत. फिल्म मेकरच्या प्रवक्ताच्या माहितीनुसार, रूटीन हेल्थ चेकअप करता त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पहिल्यांदाच ते रूग्णालयात दाखल झालेले नाहीत. त्यांच्या प्रकृतीबाबत चाहते आणि सिनेकलाकार चिंतेत होते. २००४ मध्ये हिंदी सिनेमा 'युवा' च्या शुटिंग दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
साल २००९ आणि २०१५ मध्ये त्यांना छातीच्या दुखण्याने ग्रासलं होतं. मात्र त्यानंतर त्यांच्या तब्बेतीत लवकरच सुधारणा झाली होती. मणिरत्नम यांनी नुकतीच 'चेक्का चिवंथा वनम' या सिनेमाचं शुटिंग पूर्ण केलं आहे. गुरूवारी दुपारी मणिरत्नम याच सिनेमाच्या एडिटिंगमध्ये व्यस्त होते. तेव्हाच त्यांची तब्बेत बिघडली.
मणिरत्नम यांचा 'चेक्का चिवंथा वनम' हा सिनेमा औद्योगिक प्रदूषण या विषयावर आधारित आहे. या सिनेमांत सिंबु, विजय सेतुपति, अरविंद स्वामी, अरूण विजय, ज्योतिका, अदिती राव हैदरी आणि ऐश्वर्या राजेश सारखे कलाकार आहे. मणिरत्नम यांनी बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे बनवले. त्यांचा रोझा, बॉम्बे, रावन, दिल से, युवा आणि गुरू या सिनेमांनी प्रेक्षकांनी खूप पसंत केलं. मणिरत्नम यांनी तब्बल ६ वेळा राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला आहे. १९८८ मध्ये तामिळ यांनी अभिनेत्री सुहासिनी यांच्याशी लग्न केलं. त्यांना एक मुलगा देखील आहे,.