'टीका केल्याने काही फरक पडत नाही'

ट्विंकलचे वक्तव्य

Updated: Oct 10, 2019, 03:07 PM IST
'टीका केल्याने काही फरक पडत नाही'  title=

मुंबई : टीका केल्याने काही फरक पडत नाही. असे वक्तव्य बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने केले आहे. ट्विंकल नेहमी तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. त्यामुळे ती नेहमी वादाच्या भोवऱ्यात असते. परंतु या सर्व गोष्टींचा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Sunlight working its magic better than any man or woman-made filter #shortbreakfromreality

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna) on

आपल्या अशा स्वभावावर भाष्य करताना ती म्हणाली 'मी पहिल्यापासून अशीच आहे. कोणत्याही गोष्टीवर परखड  मत  मांडताना मी कधीही मागे पुढे पाहत नाही.' 

त्याचप्रमाणे आयुष्यात कोणत्याच गोष्टी फार गंभीर नसतात. ज्याबद्दल आपण चेष्टा करू शकत नाही. शिवाय मृत्यू देखील तिच्यासाठी एक साधारण बाब आहे. तिच्या या स्वभावामुळे ती कायम अडचणीत येत असल्याचे तिचे म्हणने आहे.
 
ट्विंकल खन्नाला प्रत्येक गोष्टी स्वत:च्या मर्जीने करण्याची सवय आहे. परंतु ती स्वत:ची ही सवय कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.