अखेर Hrithik Roshan कडून प्रेमाची कबुली?

 हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या नात्याबद्दल अटकळ बांधली जात आहे. 

Updated: Mar 26, 2022, 06:53 PM IST
अखेर Hrithik Roshan कडून प्रेमाची कबुली? title=

मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून बॉलीवूडचा सुपरहिरो हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या नात्याबद्दल अटकळ बांधली जात आहे. येत्या काही दिवसांत हे दोघंही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. मात्र आतापर्यंत दोघांकडून या नात्यावर मौन बाळगलं जात होतं. पण आता खुद्द हृतिक रोशन उघडपणे त्यांच्या नात्याच्या सत्यावर शिक्कामोर्तब करताना दिसत आहे. त्याच्या इन्स्टा चॅटने या बातमीची पुष्टी केली आहे.

दोघांकडून एकमेंकांवर प्रेमाचा वर्षाव
पुण्यातील एका कॉन्सर्टसाठी  तयार होत असल्याचा व्हिडिओ सबाने शेअर केला आहे. सबाने तिचा 'साउंड चेक' क्षण रेकॉर्ड केला आणि हृतिकचं लक्ष वेधून घेतलं. हृतिकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर केला आणि त्यासोबत लिहिलं,'किल इट, अप्रतिम महिला... काश मी आता तिथे तुझ्यासाठी असतो.'

सबाची  प्रकिक्रीया
ही प्रतिक्रिया पाहून सबाही गप्प बसली नाही. तिने अभिनेत्याची स्टोरी देखील पाहिली आणि त्याची स्टोरी पुन्हा शेअर केली आणि हृतिकला म्हणाली, 'माझ्या प्रिय @ Hrithikroshan काश तु  ईथे असतास अशी माझी इच्छा होती. आता उघडपणे प्रेम करणाऱ्या या गोष्टींमुळे या नात्याची खोली लोकांना जाणवू लागली आहे. हे दोघं 'चांगले मित्र' नसून बरंच काही असू शकतात, असं लोकं सोशल मीडियावर कमेंट बॉक्समध्ये लिहित आहेत.