पांड्या आणि राहुलच्या वक्तव्यानंतर हॉटस्टारचा महत्वाचा निर्णय

वादाला पूर्णविराम मिळणार का? 

पांड्या आणि राहुलच्या वक्तव्यानंतर हॉटस्टारचा महत्वाचा निर्णय  title=

मुंबई : करण जोहरचा लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्ये आलेले क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. हे दोघे ही भारतीय क्रिकेट मधील आताचे खेळाडू आहेत. यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. पण आता असं वाटत आहे या दोघांनी या कार्यक्रमात येऊन खूप मोठी चूक केली आहे. 

या कार्यक्रमात करण जोहरने हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलसोबत अगदी खासगी जीवनातील प्रश्न विचारले. पांड्याने आपल्या मैत्रिणींसोबतच्या नाइट क्लबमधील अनेक गोष्टी शेअर केल्यात. तसेच हार्दिक पांड्याच्या अनेक वक्तव्यांवर बीसीसीआय देखील कठोर कारवाई करू शकते असे दिसत आहे. 

अनेक स्तरावरून टिका झाल्यावर हार्दिक पांड्याने इंस्टाग्रामवरून माफी मागितली. तर आता हॉटस्टारने खूप महत्वाचा निर्णय घेतला आहे. हॉटस्टारने हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुलचा प्रसारित झालेला एपिसोड काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.  

पांड्याने या कार्यक्रमात सांगितलं की, मी माझ्या पालकांसोबत खूप मोकळेपणाने बोलते. माझ्या प्रत्येक गर्लफ्रेंडबद्दल त्यांना माहित आहे. तसेच पांड्याने या कार्यक्रमात अनेक महिलांसोबत फिरण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच मला महिलांना मूव करताना पाहणं आणि त्यांना ऑब्जर्व करणं अधिक पसंत आहे. मी थोडा ब्लॅक साइडमधून आहे. त्यामुळे ती महिला कशी मूव करते हे पाहणं माझ्यासाठी महत्वाचं असतं, असं देखील पांड्या म्हणाला. 

हा एपिसोड पाहिल्यानंतर प्रत्येकाने पांड्यावर भरपूर टिका केली. सोशल मीडियावर चाहत्यांनी खूप राग व्यक्त केला.  या विधानांवर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि सध्याचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली यानेही प्रतिक्रिया दिली आहे. भारताचा क्रिकेट संघ आणि जबाबदार क्रिकेटपटू म्हणून आम्ही या दोन्ही क्रिकेटपटूंनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन करत नाही. त्यांनी व्यक्त केलेली मते ही त्यांची वैयक्तिक होती. संघाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. या प्रकरणी बीसीसीआय काय निर्णय घेते, याची आम्ही वाट पाहतो आहोत. दरम्यान, के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी केलेल्या वक्तव्याचा संघाच्या मनोबलावर काहीही परिणाम झालेला नाही, असेही त्याने स्पष्ट केले.