नेहा कक्करच्या पतीवर मोठं संकट; घडला धक्कादायक प्रकार

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे.

Updated: May 14, 2022, 01:46 PM IST
नेहा कक्करच्या पतीवर मोठं संकट; घडला धक्कादायक प्रकार title=

मुंबई : हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील एका हॉटेलमधून गायिका नेहा कक्करचा पती रोहनप्रीत सिंगच्या सामानाची चोरी झाली आहे. हॉटेलमधून त्याचं अॅपल वॉच, आयफोन आणि हिऱ्याची अंगठी चोरीला गेली आहे.

प्रसिद्ध बॉलीवूड गायिका नेहा कक्करचा पती रोहनप्रीत सिंगचं अॅपल वॉच, आयफोन आणि हिऱ्याची अंगठी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमधून चोरीला गेली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे.

असं सांगितलं जात आहे की, पंजाबी गायक रोहनप्रीत शुक्रवारी रात्री हॉटेलमध्ये थांबला होता. त्याने सकाळी पाहिलं तर टेबलवर त्याचं घड्याळ नव्हतं. फोन किंवा रिंग नव्हती. पोलीस हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत. त्याचबरोबर कर्मचारी व कर्मचाऱ्यांवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एचपी मंडी शालिनी अग्निहोत्री यांनी याला दुजोरा दिला आहे. हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.

रिलीज केलं आपलं नवं गाणं
 नेहा कक्करच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, नुकतीच ती तिचं नवीन गाणं 'ला ला ला' घेऊन आली आहे. या व्हिडिओ गाण्यात तिच्यासोबत पती रोहनप्रीतही दिसत आहे. दोघांची केमिस्ट्री याआधीही पाहायला मिळाली होती. ज्याला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं होतं. नेहाच्या या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा पती रोहनप्रीतसोबत रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत असून लोकांना हे 'ला ला ला' गाणे खूप आवडते.