Highest Paid TV Judges: टीव्ही जगतातील सर्वात महागडे जज, या स्टार कलाकारांची कमाई करोडोत

Highest Paid TV Judges: अनेक वर्षांपासून रिअ‍ॅलिटी शो टीव्हीच्या जगावर कब्जा करत आहेत. यापूर्वी या शोजमध्ये जज करण्यासाठी तज्ज्ञ बोलवले जात होते, पण कालांतराने बॉलिवूड सेलेब्स देखील जजच्या खुर्चीवर बसू लागले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करु लागले आहेत.

Updated: May 24, 2022, 01:11 PM IST
Highest Paid TV Judges: टीव्ही जगतातील सर्वात महागडे जज,  या स्टार कलाकारांची कमाई करोडोत  title=

मुंबई : Highest Paid TV Judges: अनेक वर्षांपासून रिअ‍ॅलिटी शो टीव्हीच्या जगावर कब्जा करत आहेत. यापूर्वी या शोजमध्ये जज करण्यासाठी तज्ज्ञ बोलवले जात होते, पण कालांतराने बॉलिवूड सेलेब्स देखील जजच्या खुर्चीवर बसू लागले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करु लागले आहेत.

रेमो डिसूझा : बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझा याने डान्सच्या जगाला एक नवा आयाम दिला आहे.  जेव्हा रेमो 'डान्स इंडिया डान्स'ला जज करत होता, तेव्हा एका एपिसोडसाठी त्याने 2.5 लाख रुपये घेतले होते.

हिमेश रेशमिया: गायक आणि संगीतकार हिमेश रेशमिया हा सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो 'इंडियन आयडॉल'च्या जजपैकी एक आहे. हिमेश रेशमिया एका एपिसोडसाठी सुमारे 4 लाख रुपये घेतो.

नेहा कक्कर : नेहा कक्कर ही सिंगिंग रिअ‍ॅलिटी शोची जान बनली आहे. ती दररोज 'इंडियन आयडॉल' शोला जज करताना दिसत आहे. नेहा एका एपिसोडसाठी 5 लाख रुपये घेते.

नेहा धुपिया : बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया हिने चित्रपटांच्या दुनियेत फारसे नाव कमावले नसेल. पण 'रोडीज'मध्ये जज बनून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. नेहा धुपिया एका एपिसोडसाठी 8 लाख रुपये घेते.

रोहित शेट्टी : बॉलीवूडचा तडफदार दिग्दर्शक रोहित शेट्टी गेल्या पाच वर्षांपासून 'खतरों के खिलाडी'चे सूत्रसंचालन करत आहे. या एपिसोडसाठी तो 9 लाख रुपये घेतो, असं सांगितले जाते.

मलायका अरोरा : ब्युटी क्वीन मलायका अरोरा अनेक टीव्ही प्रोजेक्टमध्ये दिसते. 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये ती जजच्या भूमिकेत दिसते. ती संपूर्ण सीझनसाठी एक कोटी रुपये घेते.

शिल्पा शेट्टी : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी अनेक रिअ‍ॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसते. रिपोर्ट्सनुसार, 'सुपर डान्सर'साठी शिल्पा शेट्टीने 14 कोटी रुपये घेतले होते.