विजय देवरकोंडा, रश्मिका मंदानाचे खासगी फोटो मोठ्या स्क्रीनवर झळकले; तिने कॅमेरामनची कॉलर पकडून..

Hi Nanna Event Controversy Vijay Devarakonda Rashmika Mandanna Private Pics: चित्रपटासाठी आयोजित कार्यक्रमाच्या स्टेजवरील मोठ्या स्क्रीनवर अचानक हे खासगी फोटो दिसू लागले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 9, 2023, 04:49 PM IST
विजय देवरकोंडा, रश्मिका मंदानाचे खासगी फोटो मोठ्या स्क्रीनवर झळकले; तिने कॅमेरामनची कॉलर पकडून.. title=
कार्यक्रम सुरु असतानाच दाखवले फोटो

Hi Nanna Event Controversy Vijay Devarakonda Rashmika Mandanna Private Pics: आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये नुकताच 'हाय नाना'चा प्री-रिलीज इव्हेंट पार पडला. या इव्हेंटमध्ये बॉलवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि तेलगू अभिनेता नानी यांनी हजेरी लावली. कार्यक्रमादरम्यान अचानक स्टेजवरील मोठ्या स्क्रीनवर अभिनेता विजय देवरकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाचे खासगी फोटो पाहायला मिळाले. हे फोटो पाहून साऱ्यांनाच धक्का बसला. कार्यक्रमाची समालोचक सुमावरही टीका केली जात आहे. समालोचक असलेल्या सुमाने दिलेली प्रतिक्रयेवरुन तिच्यावरही टीका होतेय. दुसरीकडे समोरच बसलेली मृणाल ठाकूरही हे फोटो पाहून थक्क झाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नानीने या सर्व प्रकरणावर भाष्य केलं आहे. त्याने विजय आणि रश्मिकाची माफी मागितली आहे.

नक्की घडलं काय?

अभिनेत्री आणि समालोचक सुमा कनकलाने 'हाय नानी' चित्रपटाच्या कार्यक्रमामध्ये विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाचे जुने फोटो दाखवले. मात्र यामुळे चाहते बुचकाळ्यात पडले. अभिनेत्री मृणाल ठाकूरलाही धक्का बसला. नानीच्या चेहऱ्यावर मात्र स्मितहास्य होतं. तर समालोचक सुमाने मुद्दाम जवळच उभ्या असलेल्या फोटोग्राफरची कॉलर पकडून मालदीवमध्ये त्यांचे फोटो तू काढलेस का? असा प्रश्न विचारला. 

नानीने घडलेल्या प्रकारावर नोंदवली प्रतिक्रिया

विजय आणि रश्मिकाचे फोटो कार्यक्रमादरम्यान स्टेजवरील स्क्रीनवर का दाखवण्यात आले असा प्रश्न नानीला मुलाखतीत विचारण्यात आला. "दुर्देवाने हे सारं घडलं. काय सुरु आहे हे मला कळेपर्यंत तो फोटो स्क्रीनवरुन हटवण्यात आला. आम्ही फार जवळचे मित्र आहोत. विजय आणि रश्मिका नक्की समजून घेतील की अशा गोष्टी घडू शकतात. मात्र यामुळे सर्वांनाच मनस्ताप झाला. यासाठी मी आणि माझी टीम खरोखर सर्वांची माफी मागतो," असं नानीने म्हटलं आहे.

मला किंवा सुत्रसंचालन करणाऱ्या सुमालाही हे फोटो दाखवले जातील याची काहीच कल्पना नव्हती. तसेच हे सगळं कोणी केलं याची मला काहीही कल्पना नाही, असं नानीने म्हटलं आहे. "अशा कार्यक्रमासाठी अनेकजण झटतात. असा प्रकार कधीच घडता कामा नये. हे कोणी केलं यासंदर्भात शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र ज्याने हे केलं असेल तो फार घाबरला असेल तर आम्ही त्याला जाऊ दिलं. आमच्यासाठी ही हे वाईट होतं कारण हा चित्रपटासाठीचा कार्यक्रम होता गॉसिपची वेबसाईट नाही," असं म्हणथ नानीने नाराजी व्यक्त केली.

चाहत्यांकडून टीकेची झोड

आपल्या चित्रपटाच्या प्रचारासाठी एखाद्याला बदनाम करायचं हे फारच लज्जास्पद आहे असं एका चाहत्याने या व्हिडीओवर प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं आहे. हे सर्व कलाकार नुसते दात काढत आहेत. त्यांना गांभीर्य समजायला हवं. सुमा हा फार वाईट समालोचक आहे, असं अन्य एकाने म्हटलं आहे.