‘उबुंटू’ सिनेमाचा टिझर लाँच

अभिनेते आता दिग्दर्शनाचा प्रयत्न करत आहेत. तर दिग्दर्शक अभिनयाचा हे आपण  प्रसाद ओकच्या ''कच्चा लिंबू" मध्ये पाहिलंच. आता या पाठोपाठ प्रसादचा अगदी जवळचा मित्र आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री देखील दिग्दर्शनाकडे वळला आहे. पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित 'उबुंटू' नावाचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा टिझर रिलिज झालं आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 15, 2017, 08:08 PM IST
   ‘उबुंटू’ सिनेमाचा टिझर लाँच  title=

मुंबई : अभिनेते आता दिग्दर्शनाचा प्रयत्न करत आहेत. तर दिग्दर्शक अभिनयाचा हे आपण  प्रसाद ओकच्या ''कच्चा लिंबू" मध्ये पाहिलंच. आता या पाठोपाठ प्रसादचा अगदी जवळचा मित्र आणि अभिनेता पुष्कर श्रोत्री देखील दिग्दर्शनाकडे वळला आहे. पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित 'उबुंटू' नावाचा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचा टिझर रिलिज झालं आहे. 

 नुकतेच प्रदर्शित झालेल्या टिझरमुळे प्रेक्षकांना आता  'उबुंटू' या चित्रपटाची एक छोटीशी झलक पाहायला मिळणार. या टिझरमध्ये शाळा आणि त्याभोवताली घडणारे प्रसंग पाहायला मिळतील. 
स्वरुप रिक्रिशन अँड मिडीया प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि फेबल फॅक्टरी निर्मित 'उबुंटू' या चित्रपटाची दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखनाची जबाबदारी पुष्कर श्रोत्रीने पेलली आहे.  तसेच या चित्रपटाचे संगीतकार श्रीरंग गोडबोले आणि समीर सामंत हे आहेत तर कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे. 

या चित्रपटाचे दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री आहे म्हटंल्यावर अप्रतिम कलाकृती प्रेक्षकांना पाहायला मिळणार याची खात्री वाटते. पुष्करच्या मित्राचा म्हणजे प्रसाद ओकचा कच्चा लिंबू हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या पसंतीला पडत आहे.