मुंबई : रामानंद सागर यांची पौराणिक मालिका 'श्री कृष्णा' ने १९९३ साली दूरदर्शनवर एक विक्रम रचला. ही मालिका तब्बल ७ वर्षे चालली आहे. आणि याच मालिकेने १६ वर्षाच्या स्वप्नील जोशीला त्या सात वर्षात एक सुपरस्टार बनवलं.
या मालिकेने नंतर स्वप्नील जोशीला मिळालेली प्रसिद्धी ही खरंच वाखाण्याजोगी आहे. या मालिकेत स्वप्नील जोशीने साकारलेली श्री कृष्णाची भूमिका इतकी अजरामर झाली की, चाहते त्याला खराखुरा श्री कृष्ण मानू लागले होते. आणि हाच तो क्षण होता जेव्हा स्वप्नील जोशीने आपलं करिअर याच क्षेत्रात करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारीच जन्माष्टमी झाली या निमित्ताने पुन्हा एकदा श्री कृष्णा या मालिकेच्या आठवणी ताज्या झाल्या. आणि त्या निमित्ताने स्वप्नील जोशीचं करिअर पुन्हा एकदा न्याहाळता आलं. एका मालिकेने ज्याला मराठीचा 'चॉकलेट हिरो' अशी एक ओळख मिळाली आणि आज आपण त्याचं करिअर पाहातच आहोत.
१) सर्वात प्रथम स्वप्नील जोशीने 'रामायण' या मालिकेत काम केलं होतं. पण मला आणि माझ्या कामाला प्रसिद्धी मिळाली ती 'श्री कृष्ण' या मालिकेतून. या मालिकेने मला प्रसिद्धीच नाही तर एक कलाकार म्हणून चांगल मानधन देखील दिलं. विचार करा वयाच्या १६ वर्षी लोकं मला देवासमान वागणूक देत होते. प्रेक्षक माझ्याकडे श्रध्देपोटो येत असतं. त्यांना असे वाटतं असे की, आपल्या आणि देवाच्यामध्ये स्वप्नील जोशी हे एक माध्यम आहे. स्वप्नील असं म्हणतो, की मला माहित नाही मी आयुष्यात किती काम करेन पण श्री कृष्ण ही मालिका माझ्यासाठी कायमच खास असणार आहे.
२) श्री कृष्ण या मालिकेमुळे स्वप्नील जोशीच्या फॅन्समध्ये प्रचंड वाढ झाली. एवढचं काय तर प्रेक्षक कॉलेजमध्ये देखील स्वप्नील असताना त्याच्या पाया पडतं. आणि ते त्याला श्री कृष्णचं मानतं.
३) याबाबतचा किस्सा सांगताना स्वप्नील म्हणतो की, मी फस्ट इअरला असताना एक माझा चाहता आला आणि चक्क तो आपल्या गुडघ्यांवर उभा राहिला. आणि त्याने माया पाया पडून चक्क रडायला सुरूवात केली. हा क्षण खूप विचित्र होता माझ्यासाठी पण काही वेळाने त्याने सगळा प्रकार मला सांगितला. तो म्हणतो की, मी चैन स्मोकर होतो. पण मी स्मोकिंग करणं हे देवाच्या भीतीने सोडलं. जेव्हापण मी सिगरेट हातात घेत होतो तेव्हा माझ्यासमोर तुझा म्हणजे श्री कृष्णाचा फोटो समोर येत असे.
४) स्वप्नील जोशीचा जन्म १८ ऑक्टोबर १९७७ रोजी मुंबईतील गिरगावात झाला. अगदी सामान्य घरात स्वप्नीलचा जन्म झाला असून त्याचे पालक सरकारी नोकरीत होते. आणि स्वप्नील हा त्यांचा एकमेव मुलगा आहे.
५) स्वप्नील जोशीने आपलं बी.कॉम पर्यंतचं शिक्षण सिडनॅम कॉलेजमध्ये पूर्ण केलं आहे.
६) श्री कृष्ण ही मालिका करेपर्यंत स्वप्नील जोशीला कोणतेही डेअरी प्रोडक्टस आवडतं नसतं. मात्र ही मालिका सुरू झाल्यानंतर त्याला लोणी, तूर आणि डेअरीचे इतर पदार्थ आवडू लागले. त्यानंतर या पदार्थांमुळे त्याचं इतकं वजन वाढलं की त्यालाच त्याचं विचित्र वाटलं.
७) श्री कृष्णा ही मालिका संपल्यानंतर स्वप्नील जोशीने ब्रेक घेतला. आणि तो कल तरूण कलाकार म्हणून आपल्याला संजीव भट्टाचार्याच्या 'कॅम्पस' या शोमध्ये दिसला. त्यानंतर त्याने अनेक मालिका केल्या जशा की 'अमानत', 'देश मैं निकला होगा चांद', 'भाभी'
८) स्वप्नील जोशीचं लीना आराध्ये सोबत लग्न झालं ती डेन्टिस्ट आहे. तिच्या अगोदर त्याचं लग्न अपर्णा जोशीसोबत झालं होतं तिचं देखील प्रोफेशन डेंटिस्ट होतं. अपर्णाशी २००५ मध्ये विवाह झाल्यानंतर २००९ मध्ये घटस्फोट झाला.
९) त्यानंतर स्वप्नील जोशीचं लीनासोबत १६ डिसेंबर २०११ साली औरंगाबादमध्ये लग्न झालं.
१०) स्वप्नील आणि लीनाला आता १ वर्षाची मुलगी आहे. जिचं नाव 'मायरा'. तेव्हा स्वप्नील जोशीने चक्क २ महिन्याचा ब्रेक घेतला होता.
११) स्वप्नील जोशी रविवारी काम करत नाही. स्वप्नीलला लाँग ड्राईव्हला जायला आणि बॉलिवूड क्लासिकल साँग आवडतात.
१२) नुकताच स्वप्नील जोशी प्रोडक्शन क्षेत्रात प्रवेश केला आहे. भिकारी हा त्याचा सिनेमा ११ ऑगस्टला प्रदर्शित झाला. स्वप्नील जोशी बॉलिवूडमधील हृतिक रोशनचा अफलातून फॅन आहे. जर श्री कृष्णावर आधारित सिनेमा तयार झाला तर स्वप्नीलला कृष्णाची भूमिका हृतिक रोशनने केलेली आवडेल.