मुंबई : बॉलीवूडचे शो मॅन म्हणवले जाणारे राज कपूर हे केवळ एक उत्तम अभिनेतेच नव्हते तर त्यांनी अनेक चित्रपटांचं दिग्दर्शनही केलं आहे. ते उत्तम निर्माता-दिग्दर्शकही होते. आजही लोक त्यांचे चित्रपट मोठ्या आवडीने पाहतात. हेमा मालिनी यांनी राज कपूर यांच्या 'सपनो का सौदागर' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या करिअरची सुरुवात केली. पहिल्या चित्रपटानंतर राज कपूर यांनी हेमा मालिनी यांना 'सत्यम शिवम सुंदरम' ऑफरही केली होती. ज्याबद्दल हेमाही खूप उत्साहित होत्या. पण सेटवर असं काही घडलं की, हेमा यांचे हात पाय सुजायला लागले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज कपूर यांनी हेमा मालिनी आधी झीनत अमान आणि राजेश खन्ना यांना 'सत्यम शिवम सुंदरम' चित्रपटाची ऑफर दिली होती. ज्यासाठी दोघांनीही होकार दिला होता. यानंतर राज कपूर यांनी हेमा यांना आरके स्टुडिओमध्ये स्क्रीन टेस्टसाठी बोलावलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा राज कपूर यांनी हेमा मालिनी यांना चित्रपटातील तिच्या 'रूपा' या व्यक्तिरेखेबद्दल सांगितलं तेव्हा अभिनेत्रीचे हात-पाय थरथरु लागले.
कसंबसं हेमा मालिनी ड्रेसिंग रूममध्ये ड्रेस घेऊन गेल्या, पण तेथून त्या परतल्याच नाहीत. हेमा मालिनी तिथून गुपचूप पळून गेल्या. त्याचवेळी राज कपूर हेमाची वाट पाहत होते. बराच वेळ होऊनही त्या परतल्या नाही तेव्हा राज कपूरला हेमाला या चित्रपटात काम करायचं नाही हे समजलं. स्वत: हेमा मालिनी यांनी एका मुलाखतीत याबाबत सांगितलं होतं की, मी हे पात्र साकारावं अशी त्यांची अपेक्षा होती. पण मला तो चित्रपट करता आला नाही.