Hema Malini Slapped: बॉलिवूडच्या नृत्यागंना हेमा मालिनी (Hema Malini) त्यांच्या नृत्यानं आजही प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करून आहेत. वयाच्या सत्तरीतही त्या अगदी एव्हरग्रीन दिसतात. कलाक्षेत्रापासून त्या सध्या दूर असून त्यांनी राजकारणातही (Hema Malini Politics) प्रवेश घेतला आहे. परंतु आजही त्यांचे सिनेमे प्रेक्षक आवर्जून बघतात. हेमा मालिनी याही अनेकदा वादात अडकल्या आहेत. त्यातून त्यांचेही अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्यातलाच एक किस्सा सध्या सगळीकडे व्हायरल होतो आहे. हेमा मालिनी यांना एका दिग्गज अभिनेत्याकडून चक्क एक नाही दोन नाही तर चक्क 20 वेळा कानशिलात (Hema Malini Slapped) लगावली होती. परंतु तेव्हा नक्की घडलं तरी काय, असा प्रश्न हा किस्सा तेव्हाही प्रेक्षकांना पडला होता आणि आजही तो प्रेक्षकांना पडतो आहे. या किस्स्यांची चर्चा आजही होताना दिसते आहे. तेव्हा जाणून घेऊया नक्की या किस्स्यामागचं खरं सत्य. (Hema malini did 20 takes for the slapping scene with ramayan actor arvind trivedi)
रामायण या मालिकेला प्रेक्षकांनी भरपूर पसंती दिली. या मालिकेतील रावण हे पात्र साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांच्यावर त्यांच्या चाहत्यांनी खूप प्रेम केले. त्यांचे पात्र नकारात्मक असले तरी त्यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनीही भरपूर कौतुक केले आहे. अरविंद यांनी रामायणासोबतच (Ramayan Actor Arvind Trivedi) अनेक हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटामध्ये काम केलं आहे. रामायण मालिकेतील अरविंद त्रिवेदी आणि हेमा मालिनी यांचा एका चित्रपटात एकत्र सीन होता जो त्यांना शूट करायचा होता. त्यादरम्यान अरविंद त्रिवेदी यांनी हेमा मालिनी यांच्या कानशिलात मारायचे होते. तो सीन मात्र अरविंद त्रिवेदी यांच्यासाठी फारसा कठीण होता.
'हम तेरे आशिक हैं' (Hum Toh Tere Aashik Hai) या चित्रपटात जितेंद्र आणि हेमा मालिनी यांची जोडी होती. त्यात अरविंद त्रिवेदी यांचाही एक महत्त्वपुर्ण रोल होता. या चित्रपटात हेमा मालिनी आणि अरविंद त्रिवेदी यांचा एक सीन होता ज्यात अरविंद यांना सीनप्रमाणे हेमा मालिनी यांच्या कानाखाली मारायचे होते. परंतु हा सीन करणं अरविंद यांच्यासाठी फार कठीण होतं. त्यावेळी हेमा मालिनी या सुपरस्टार अभिनेत्री होत्या आणि त्यांना सगळ्यांसमोर असं कानाखाली मारणं हे अरविंद यांना फार अवघड जात होतं. ते कानाखाली मारायला फार अवघडतं होते. परंतु त्यांना तो सीन करणंही भाग होतं.
रामायण या मालिकेचे सर्वेसर्वा रामानंद सागर (Ramanand Sagar) यांच्या मुलानं हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता असं कळते, ते म्हणाले होते की, त्यांना हेमा मालिनी यांच्यासोबत असा सीन करणं फार अवघड जातं होतं त्यासाठी त्यांनी 20 टेक्स दिले. शेवटी हेमा मालिनी यांनी सांगितले की, तुम्ही मी कोणी सुपरस्टार आहे हे विसरून जा आणि सीन पुर्ण करा तेव्हा त्यांनी हा सीन पुर्ण केला आणि तो सीन साकार झाला. अरविंद त्रिवेदी हे गुजरातवरून आले होते आणि रावणच्या भुमिकेसाठी पहिली चॉईस ही अमरिश पुरी यांची होती परंतु त्यांच्या अभिनयानं सगळ्यांचीच मनं जिंकून घेतली.