पती धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा लिपलॉक किस, अखेर हेमा मालिनी यांनी सोडलं मौन

Hema Malini : सगळीकडे चर्चेत असलेल्या धर्मेंद आणि शबाना आझमी यांच्या सीनवर सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर अखेर आता हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 5, 2023, 01:27 PM IST
पती धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा लिपलॉक किस, अखेर हेमा मालिनी यांनी सोडलं मौन title=
(Photo Credit : Social Media)

Hema Malini : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट हे त्यांच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सतत चर्चेत आहे. धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांची किस तर प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. अजूनही सोशल मीडियावर देखील त्याचीच चर्चा सुरु आहे. या सीनवर धर्मेंद्र, शबाना आझमी, शबाना यांचे पती जावेद अख्तर यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. त्यावर आता धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी यांनी त्या किसिंग सीनवर प्रतिक्रिया दिली आहे. 

हेमा मालिनी यांनी नुकतीच टाइम्स नाऊला मुलाखत दिली होती. त्यावेळी हेमा मालिनी यांना धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनविषयी विचारण्यात आले तेव्हा त्या सुरुवातीला हसल्या. त्यानंतर हेमा मालिनी म्हणाल्या, 'मी अजून तो सीन पाहिला नाही आहे. खरंतर, मला यावर विश्वास आहे की प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच आवडला असेल. मी धरम जींसाठी खूप आनंदी आहे, कारण त्यांना नेहमीच कॅमेऱ्यासमोर रहायला आवडतं. धरम जींचे त्यांच्या कामावर प्रचंड प्रेम आहे.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शबाना आझमी यांनी झूमला दिलेल्या मुलाखतीत या किसिंग सीनविषयी सांगितले की 'किसिंग सीन शूट करताना कोणतीही अडचण आली नाही. प्रेक्षकांना हा सीन प्रचंड आवडतोय. ते चित्रपट बघताना हसत होते आणि टाळ्या वाजवत होते. हो, ही गोष्ट खरी आहे की मी याआधी स्क्रीनवर किसिंग सीन केले नाहीत. पण कोणाला धर्मेंद्र यांच्यासारख्या हॅंडसम व्यक्तीला किस करायची इच्छा होणार नाही?' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

करण जोहर दिग्दर्शित रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटात आपल्याला रोमॅंटिक आणि फॅमिली ड्रामा पाहायला मिळत आहे. तर रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याशिवाय या चित्रपटात धर्मेंद्र, शबाना आझमी आणि जया बच्चन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान, या चित्रपटानं जगभरात पहिल्याच आठवड्यात 146.50 कोटींचा गल्ला केला. 

हेही वाचा : उपचारासाठी समांथानं तेलगू अभिनेत्याकडून घेतले 25 कोटी? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

चित्रपटातील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या विषयी बोलायचे झाले तर धर्मेंद्र आणि शबाना एकेकाळी रिलेशनशिपमध्ये असल्याचे दाखवण्यात आले. मात्र, धर्मेंद्र यांचे जया बच्चन यांच्याशी लग्न होते. लग्नानंतरही धर्मेंद्र हे शबाना आझमीला ओळखू शकत नाही आणि ते जया बच्चनसोबत एकाच घरात अनोळखी व्यक्तीसारखे राहतात. चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.