Hema Malini Dharmendra : बॉलिवूड (Bollywood)मधील 80 व्या दशकातील अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)- अभिनेत्री रेखा (Rekha) आणि अभिनेत्री हेमा मालिनी-धर्मेंद्र (Hema Malini- Dharmendra) यांची लव्ह स्टोरी (love) खूप गाजली होती. अमिताभ-रेखानंतर जर कोणाची लव्ह स्टोरीची आजही चर्चा होते ती म्हणजे हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची...हिंदी चित्रपटसृष्टीतील ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचा आज वाढदिवस (Hema Malini Birthday). त्या आज 74 वर्षांच्या झाल्या आहेत. हेमाने बालकलाकार म्हणून फिल्मी दुनियेत प्रवेश केला. त्या अवघ्या 14 वर्षांच्या होत्या तेव्हा त्या चित्रपटात आल्या आणि बघता बघता सिनेविश्वाच्या ड्रीम गर्ल बनल्या.
फिल्मी दुनियेत उत्तम काम करण्यासोबतच हेमा धर्मेंद्रसोबतच्या नात्यामुळे नेहमीच चर्चेत असतं. दोघांनी 1980 मध्ये लग्न केले. पण त्यासाठी धर्मेंद्र आणि हेमाने खूप पापड बनवले. या दोघांची प्रेमकहाणी कुठल्याही फिल्मी कथेलाही मागे सोडले. त्यामुळे या दोघांच्या प्रेमाचे किस्से आजही बॉलिवूडमध्ये ऐकायला मिळतात. हेमासोबत लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी केवळ धर्मच बदलला नाही, तर अभिनेत्रीसाठी त्यांचा आवडता मांसाहारही सोडला हे फार कमी लोकांना माहिती आहे. (Hema Malini Birthday and Hema Malini Dharmendra love story nmp)
काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत ईशा देओलने (Esha Deol) तिचे वडील धर्मेंद्र आणि आई हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले होते. या दोघांमधील नात्याला ती प्रेरणा मानते. तसंच माझ्या वडिलांनी आईसाठी खाण्याच्या सवयी बदलल्या होत्या. म्हणूनच त्यांचा विवाह माझ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे.
ईशा पुढे म्हणाली की, माझी आई पूर्णपणे शाकाहारी आहे आणि मी देखील तिच्यासारखी शाकाहारी आहे. पण माझे वडील पंजाबी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना चिकनचे (Chicken) वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतं. यामुळेच आमच्या घरात डायनिंग टेबलवर अनेक प्रकारच्या पदार्थांचं मिश्रण असतं. पण माझ्या आईला नॉनव्हेज आवडत नाही. म्हणूनच पप्पांनी स्वतःला मजबूत बनवून आईसाठी नॉनव्हेज खाणं सोडून दिलं आणि हे पाहून माझं हृदय पापांसाठी विरघळलं.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची पहिली भेट केए अब्बास यांच्या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान झाली होती. त्या दिवसांत हेमाचा एक चित्रपट प्रदर्शित होणार होता, असं सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे चित्रपटाच्या प्रीमियरच्या मध्यंतरात हेमाला स्टेजवर बोलावण्यात आलं होतं. इथेच धर्मेंद्र यांनी हेमाला पहिल्यांदा पाहिलं आणि ते हेमा मालिनीच्या प्रेमात पडले. तेव्हा हेमाला पाहून धर्मेंद्र पंजाबीत म्हणाले, 'कुड़ी बड़ी चंगी है।' मात्र, हेमा ऐकूनच पुढे निघून गेली.
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी 'तुम हसीन मैं जवान' या चित्रपटात पहिल्यांदाच दिसले होते आणि खऱ्या अर्थाने दोघेही या चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदाच भेटले होते. चित्रपटात काम करत असतानाच दोघांमध्ये जवळीक वाढू लागली आणि दोघेही नात्यासाठी गंभीर झाले.