'पैशांसाठी लग्न करणारी, निर्लज्ज ते अश्लील विधानं...'; घटस्फोटाच्या वृत्तानंतर हार्दिकच्या चाहत्यांकडून नताशावर मर्यादा सोडून टीका

Hardik Pandya's Fans Trolls Natasa Stankovic Over Divorce News : हार्दिक पांड्याचे चाहत्यांनी घटस्फोटाच्या चर्चांमध्ये केलं नताशाला ट्रोल... 

दिक्षा पाटील | Updated: May 26, 2024, 05:05 PM IST
'पैशांसाठी लग्न करणारी, निर्लज्ज ते अश्लील विधानं...'; घटस्फोटाच्या वृत्तानंतर हार्दिकच्या चाहत्यांकडून नताशावर मर्यादा सोडून टीका title=
(Photo Credit : Social Media)

Hardik Pandya's Fans Trolls Natasa Stankovic Over Divorce News : काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी नताशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या बायोमधून पांड्या हे नाव काढून टाकलं. त्याशिवाय ती मुंबई इंडियन्सला पाठिंबा देण्यासाठी कोणत्याही आयपीएल मॅचमध्ये दिसली नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये चर्चा सुरु होती की नताशाला घटस्फोट घेतला तर हार्दिकच्या पॉपर्टीचा 70 भाग मिळणार. हे सगळं ऐकताच हार्दिकच्या चाहत्यांनी नताशाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.  

नताशानं नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट पाहता त्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. नताशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या या पोस्टवर कमेंट केली आहे. एक नेटकरी म्हणाला की 'हार्दिक या पेक्षा चांगल्या पत्नीसाठी पात्र आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तू रस्त्यावरच चांगली आहेस.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मित्र हजार मिळो पण पत्नी अशी मिळायला नको.' आणखी एक हार्दिकचा चाहता म्हणाला की 'हार्दिकच्या चाहत्यांनी नताशाच्या आयडीला रिपोर्ट करा.' दुसरा नेटकरी म्हणाला की, 'मी हिटमॅनचा चाहता आहे पण मला हार्दिक पांड्यासाठी वाईट वाटतंय. आयपीएल मधली खेळी, घटस्फोट आणि वर्ल्ड कप प्रेशर.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'आताच्या काळात लग्न करणं खूप धोकादायक आहे. कधी आपल्या आयुष्यातील प्रेम आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठं फायनॅनशियल लॉस ठरेल. अशा पत्नीची लाज वाटते.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

नेटकरी इथेच थांबले नाही तर त्यांनी पुढेही नताशाला बोलणं सुरुच ठेवलं. एक नेटकरी म्हणाला, 'लोकप्रिय आणि उच्चभ्रु व्यक्तीच्या पुरुषाच्या मुलाचं आई व्हायचं. त्यानंतर लग्ना करायचं आणि मग घटस्फोट घ्यायचा. कोणत्याही पैशांची गरज न लागता करण्यात येणारा किती चांगला स्टार्टअप आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आजच्या पीढीला घटस्फोट घेणं किंवा विभक्त होणं किती सोपं वाटतं ना. त्यांच्या मुलांचा ते विचारही करत नाहीत. मुलासाठी मला वाईट वाटतंय.'

हेही वाचा : 'स्वतःला हिंदू म्हणताना, आपल्या धर्माला...'; प्रवीण तरडे यांच्या पत्नीच्या पोस्टची एकच चर्चा:

दरम्यान, नताशाला किती संपत्ती मिळणार यावरून चांगलाच वाद सुरु आहे. काही ठिकाणी असा दावा करण्यात आला आहे की हार्दिकच्या संपत्तीचे 70 टक्के तिला पोटगीच्या स्वरुपात मिळणार आहे. तर दुसरीकडे हार्दिकचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. त्या व्हिडीओत तो बोलताना दिसतोय की त्यांची 50 टक्के संपत्ती ही त्यानं त्याच्या आईच्या नावावर केली आहे.