VIDEO : 'मंकी बात'च्या गाण्याचा 'हाहाकार...'

'हाहाकार...' या धम्माल मस्तीने भरलेल्या गाण्यात बाल कलाकार वेदांत हा विविध प्रकारच्या खोड्या काढताना दिसतोय

Updated: May 1, 2018, 05:12 PM IST
VIDEO : 'मंकी बात'च्या गाण्याचा 'हाहाकार...'  title=

मुंबई : निष्ठा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या बहुचर्चित 'मंकी बात' या धम्माल बालचित्रपटातील 'हाहाकार...' हे गाणं नुकतंच यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आलंय. चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता 'हाहाकार...' या गाण्यालाही उन्हाळ्याच्या सुट्टीत बच्चेकंपनीची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याचं दिसतंय.  
 
'हाहाकार...' या धम्माल मस्तीने भरलेल्या गाण्यात बाल कलाकार वेदांत हा विविध प्रकारच्या खोड्या काढताना दिसतो आहे. गाण्यातील ओळी प्रमाणेच 'माणसामधील माकड करते भूभूत्कार' असे माकडचाळे करताना तो आपल्याला दिसतोय. शाळेतले गुरुजी, विद्यार्थी आणि सोसायटीतील म्हाताऱ्या व्यक्तीदेखील त्याच्या खोडयांपासून वाचलेले नाहीत. 

हे गाणं शुभंकर कुलकर्णी यानं गायलंय. चित्रपटाला संदीप खरे यांची गीते व संवाद आणि डॉ. सलील कुलकर्णी यांचे संगीत लाभलंय.  चित्रपटात बाल कलाकार वेदांत सह पुष्कर श्रोत्री आणि भार्गवी चिरमुले प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा महेंद्र कदम आणि विजू माने यांनी लिहिली आहे. धम्माल विनोदी असणारा ‘मंकी बात’ हा बालचित्रपट उन्हाळ्याच्या सुट्टीत येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील बच्चे कंपनीला भेटायला येणार आहे.