'भेटला विठ्ठल माझा... भेटला विठ्ठल...', बाळासाहेब आणि दिघेसाहेबांच्या नात्याचा विणलेला एक-एक धागा

'गुरुपौर्णिमा हा गुरूचा नाही, शिष्याचा दिवस आहे.... '  दिघेसाहेबांच्या आयुष्या बाळासाहेबांचा महत्त्वाचा वाटा  

Updated: Apr 26, 2022, 12:34 PM IST
'भेटला विठ्ठल माझा... भेटला विठ्ठल...',  बाळासाहेब आणि दिघेसाहेबांच्या नात्याचा विणलेला एक-एक धागा title=

मुंबई : प्रत्येक क्षेत्रात गुरू अत्यंत महत्त्वाचं असतो.... त्यांच्या असण्यामुळे शिष्याचं पूर्ण आयुष्य बदलतं, म्हणजे, 'संगतीने ओलांडला अवघड घाट...' असं म्हणायला हरकत नाही... शिक्षण, कला एवढंच नाही राजकारणात देखील गुरूमुळे दुसरा राजकारणी घडतो... हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघें यांच्यात गुरू-शिष्याचं नातं कसं होतं, हे 'धर्मवीर' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

महाराष्ट्रानंही राजकारणाचा एक असा अध्याय पाहिला आहे, जिथं निस्वार्थ नाती- सलोखा आणि आपलेपणा राजकारणाहूनही वर्चस्व गाजवताना दिसला. (Dharmaveer Movie video) हा अध्याय होता, 'धर्मवीर' आनंद दिघे यांच्या कारकिर्दीचा.

शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं दिघे यांच्या आयुष्यात असणारं स्थान आणि त्यांची पक्षासाठी असणारी निष्ठा या साऱ्यावरच एका सिनेमातून प्रकाशझोत टाकण्यात येत आहे.

'गुरुपौर्णिमा हा गुरूचा नाही, शिष्याचा दिवस आहे.... ' असं म्हणज थेट हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर धडकलेल्या आनंद दिघेंनी कसा त्यांच्यावरच हक्क सांगितला होता हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.