Guru Randhawaची मिस्ट्री गर्ल आली चाहत्यांसमोर

कोण आहे गुरूची मिस्ट्री गर्ल  

Updated: Jan 8, 2021, 04:03 PM IST
Guru Randhawaची मिस्ट्री गर्ल आली चाहत्यांसमोर  title=

मुंबई : सध्या कलाविश्वातील अनेक जोडपे विवाह बंधनात अडकत आहेत. तर कही जणांनी आपला साखरपुड्याचा कार्यक्रम उकरला आहे. दरम्यान पॉलीवुड (Punjabi Industry) गायक गुरु रंधावाचा (Guru Randhawa) एक फोटो तुफान व्हायरल झाला होता. व्हायरल झालेला फोटो पाहून अनेक चाहत्यांनी गुरूाचा साखरपुडा झाला असावा असा अंदाज वर्तवला. मात्र आता या फोटो मागील रहस्य समोर आलं असून गुरूचा साखरपुडा झाला नसल्य़ाचं देखील समोर आलं आहे. 

व्हायरल झालेल्या फोटोत गुरू रंधावाने मिस्ट्री गर्लचा हात धरला आहे. गुरूने इथे ब्लॅक कुर्ता-पायजमा घातला आहे. तर मिस्ट्री गर्लने ऑरेंज हेवी सूट घातला आहे. फोटो शेअर करताना गुरूने कॅप्शन दिलं आहे की,'नवीन वर्ष, नवी सुरूवात'. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Guru Randhawa (@gururandhawa)

दरम्यान गुरूने आणखी एक फोटो शेअर करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. व्हायरल झालेल्या फोटोमधील मुलगी ही अभिनेत्री  संजना सांघी (Sanjana Sanghi)आहे. गुरूने हा फोटो शुटिंगच्या वेळेचा असल्याचं सांगितलं आहे. 

गुरू रंधावाला अनेक लोकं पसंत करतात. त्याच्या नव्या गाण्याच्या प्रतिक्षेत अनेक चाहते असतात. काही दिवसांपूर्वीच 'नाच मेरी रानी' हे गाणं खूप हिट झालं. आता त्याच्या नव्या गाण्याच्या प्रतिक्षेत चाहते आहेत.