गुरु रंधावाचा विक्रम, बनला पहिला भारतीय गायक

गुरु रंधावाचा नवा विक्रम

Updated: Aug 30, 2018, 01:59 PM IST
गुरु रंधावाचा विक्रम, बनला पहिला भारतीय गायक title=

मुंबई : पंजाबी सिंगर गुरु रंधावा यांचे सध्या अनेक फॅन्स झाले आहेत. आपल्या गाण्यांनी त्याने तरुणांना भूरळ घातली आहे. सध्या गुरु रंधावा हा सगळ्यात जास्त चर्चेत असलेला गायक आहे. जगभरात त्याचे फॅन्स आहेत. रंधावा आता फक्त पंजाबी गाण्यांपूरताच मर्यादित राहिलेला नाही. बॉलिवूडमध्ये देखील त्याने आपली जादू कायम ठेवली आहे. 

गुरु रंधावाने एक रेकॉर्ड बनवला आहे. 'टी-सीरीज'च्या युट्यूब चॅनेलवर गायक गुरु रंधावा यांच्या गाण्याला 3 कोटीहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. यूट्यूबवर सर्वाधिक व्यूज असणारा तो पहिला भारतीय गायक बनला आहे. गुरु रंधावाने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

गुरु 'सूट सूट', 'हाई रेटेड गबरू', 'लाहौर' आणि 'बन जा तू मेरी रानी' सारख्या गाण्यांनी त्याने अनेकांचं मन जिंकलं आहे. गुरुने म्हटलं की, "सगळ्यांनी दिलेलं प्रेम आणि समर्थन यासाठी मी सगळ्याचे आभार मानतो. मला वाटतं की पहिल्यांदा भारतीय इतिहासात कोणत्या गायकाने 3 कोटी व्यूजचा आकडा पार केला आहे. गुरुचे इंस्टाग्रामवर देखील 50 लाख फॉलोअर्स आहेत.'