Guess Who :आजीसोबत बसलेला चिमुकला बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता

सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेता ओळखायचा आहे. 

Updated: Jan 7, 2023, 08:12 PM IST
Guess Who :आजीसोबत बसलेला चिमुकला बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता title=

Guess Who : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला ही अभिनेता ओळखायचा आहे. 

फोटोत काय? 

फोटोत तुम्ही पाहू शकता एका आजीबाईच्या शेजारी तिचा लहान नातू बसला आहे. साध्या कपड्यांमध्ये हा चिमुकला खुपच गोड दिसत आहे.फोटोत ज्याप्रमाणे तो बसलाय ते पाहून तो शांत स्वभावाचा असल्याचे कळते. हा चिमुकला बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता (Bollywood Actor) आहे. बॉलिवूडचा एक काळ या अभिनेत्याने गाजवला आहे. हा अभिनेता कोण आहे ते तुम्हाला ओळखायचे आहे. 

हा आहे अभिनेता?

हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सनी देओल आहे.फोटोत तो त्याची आजी म्हणजेच हीमन धर्मेंद्रची आई सतवंत कौर यांच्यासोबत बसलेला दिसत आहे. हाफ स्लीव्ह टी-शर्ट आणि शॉर्ट्स सनीने घातलेली आहे. आजीजवळ बसलेला तो खूप शांत दिसत आहे.खरं तर सनी देओल लहानपणापासूनच खूप शांत आहे. पण त्याचा सिनेमातला अ‍ॅक्शन हिरो अवतार पाहून विश्वास ठेवणे कठीण आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

दरम्यान आज सनी देओलचा लूक खूप बदलला आहे. बॉलिवूडमध्ये अॅक्शन हिरो म्हणून मोठा ठसा उमटवणाऱ्या सनीचे चित्रपटांमध्ये असे अनेक संवाद आहेत जे प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहतात. सनी आज एक यशस्वी राजकारणी देखील आहे. या फोटोमध्ये सनी त्याच्या आईसोबत दिसत आहे. तसेच सनीचा मुलगा करण देओलनेही चित्रपटांमध्ये पदार्पण केले आहे. सनीप्रमाणेच तोही खूप निरागस दिसतो आणि त्याच्यात त्याच्या वडिलांची झलक स्पष्टपणे पाहायला मिळते.