मुंबई: बॉलिवूड मध्ये सध्या स्टार किड्सची एन्ट्री झपाट्याने होत आहे. जाह्नवी कपूर, सारा अली खान यांच्या धमाकेदार एन्ट्री नंतर आता हिंदी सिनेमाचा हीरो नंबर 1 अभिनेता गोविंदाचा मुलगा यशवर्धन लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे यशवर्धन बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याआधी सिनेमाचे योग्य ते प्रशिक्षण घोणार आहे. सोशल मीडियावर शेअर झालेले फोटो पाहून यशवर्धन बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याचे तर्क लावले जात आहेत. यशवर्धन सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असतो.
काही वर्षांआधी गोविंदाची मुलगी नर्मदाने सुद्धा बॉलिवूड मध्ये डेब्यू केले होते. परंतू कन्या नर्मदा अभिनय क्षेत्रात फेल ठरली. बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याआधी नर्मदाने स्वत:च्या नावात बदल केले होते. तिने स्वत:चे नाव टीना आहूजा ठेवले होते. 2015 साली आलेल्या 'सेकेंड हॅंड हजबेंड' सिनेमामधून तिने डेब्यू केला होता. बॉलिवूडमध्ये अयशस्वी ठरल्यानंतर नर्मदा पंजाबी सिनेमांकडे वळली आहे.
१८ जानेवारी रोजी 'गोविंदाचा रंगीला' राजा प्रदर्शित झाला. पण गोविंदाचा हा रंगीला आवतार त्याच्या चाहत्यांना फारसा भावला नसल्याचे दिसले. गोविंदाचा रंगीला राजा पहिल्या दिवशी ५० लाख ते १ कोटींचा गल्ला जमवेल असा अंदाज दर्शवण्यात आला. पण या रंगीला राजाने बॉक्सऑफिसवर काही खास रंगत आणली नाही.