गोविंदाच्या अकाऊंटवरील हिंदूसंदर्भातील 'त्या' पोस्टवरुन वाद! गोविंदा म्हणाला, "माझं अकाऊंट..."

Govinda Clarification On Haryana Communal Violence: अभिनेता गोविंदाच्या नावाने व्हायरल झालेल्या एका स्क्रीनशॉटसंदर्भात त्याने सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर गोविंदाने हे स्पष्टीकरण दिलंय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 4, 2023, 08:51 AM IST
गोविंदाच्या अकाऊंटवरील हिंदूसंदर्भातील 'त्या' पोस्टवरुन वाद! गोविंदा म्हणाला, "माझं अकाऊंट..." title=
गोविंदाने स्पष्टीकरण देत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे

Govinda Clarification On Haryana Communal Violence: अभिनेता गोविंदा वादात सापडला आहे. गोविंदाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन केलेल्या एका ट्वीटचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला असून हा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्याने अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला आहे. गुरुग्राममध्ये झालेल्या हिंसाचाराच्या एका ट्वीटवर रिप्लाय करताना गोविंदाच्या ट्वीटर अकाऊंटवरुन हिंदूंचा उल्लेख करत एक पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर गोविंदाचं हे अकाऊंट डिअॅक्टीव्हेट करण्यात आल्याने ट्रोलर्सला घाबरुन गोविंदाने असं केल्याचा दावा अनेकांनी केला. 

गोविंदा स्पष्टीकरण देताना काय म्हणाला?

गुरुवारी गोविंदाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉटसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. माझं अकाऊंट हॅक झालं होतं. मी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया या हिंसाचारावर दिलेली नाही असं गोविंदाने म्हटलं आहे. "मला या ट्वीटसंदर्भात कॉल आला होता. मी हे सांगू इच्छितो की माझं अकाऊंट हॅक झालं आहे. माझा या हरियाणाच्या ट्वीटशी काहीही संबंध नाही. मी हे पोस्ट केलेलं नाही," अशी कॅप्शन गोविंदाने हॅक झालेल्या ट्वीटर हॅण्डलच्या व्हिडीओसहीत पोस्ट केला आहे.

माझ्या टीमनेही हे पोस्ट केलेलं नाही

"हे ट्वीट मी केलं आहे असं मानू नये मी ही पोस्ट केलेली नाही. कोणीतरी माझं अकाऊंट हॅक केलं आहे. मी यासंदर्भात सायबर गुन्हा विभागाकडे तक्रार दाखल करत आहे. मी या प्रकरणाचा छडा लावेल," असं गोविंदाने म्हटलं आहे. तसेच गोविंदाने आपल्या हरियाणातील चाहत्यांना मी ट्वीटर अकाऊंट फार सक्रीयपणे वापरत नसून ते हॅक झाल्याचं नुकतेच मला समजल्याचं म्हटलं आहे. मी किंवा माझ्या टीमने हा कंटेंट पोस्ट केलेला नाही. माझी टीम मी सांगितल्याशिवाय काहीही पोस्ट करत नाही, असं गोविंदाने स्पष्ट केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Govinda (@govinda_herono1)

व्हायरल ट्वीटमध्ये काय होतं?

आसिफ खान नावाच्या व्यक्तीने गुरुग्राममध्ये जमावाने मुस्लिमांच्या दुकानांची लूट केली असा दावा करत एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये त्याने हरियाणा हिंसाचार असा हॅशटॅग वापरला होता. हे ट्वीट गोविंदाच्या अकाऊंटवरुन कोट करुन रिट्टवीट करण्यात आलेलं. गोविंदा आहुजा 21 या ट्वीटर हॅण्डलवरुन, 'आपण हे काय करत आहोत? अशा गोष्टी करतात जे स्वत:ला हिंदू म्हणवून घेतात त्यांना लाज वाटली पाहिजे. शांतता राखा, आपण लोकशाहीमध्ये राहतो हुकुमशाहीमध्ये नाही,' असा मजकूर पोस्ट करण्यात आला होता.

केवळ स्पष्टीकरणच नाही तर गोविंदाने आगामी निवडणुकांशी या हॅकिंगचा संबंध असल्याचा इशाराही दिला आहे.