Govinda wife Sunita Ahuja : बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या 80 आणि 90 च्या दशका दरम्यान तो टॉपच्या कलाकारांमधील एक म्हटला जायचा. मात्र, त्यानंतर काही काळात त्याचं करिअर हे घसरू लागलं आणि अशात तो प्रेक्षकांचे मने जिंकण्यास अपयशी ठरू लागला. सुरुवातीच्या काळात त्यानं खूप यश मिळवलं, त्यावेळी त्यानं अनेक महिलांचे लक्ष वेधलं. गोविंदानं 1987 मध्ये त्याची गर्लफ्रेंड सुनीता आहुजाशी लग्न केलं त्याविषयी आता स्वत: सुनीता यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
गोविंदाची पत्नी सुनीता आहुजानं नुकतीत 'टाइमआउट विद अंकित' ला मुलाखत दिली. या मुलाखतीत सुनीता आहुजा यांनी नवरा गोविंदाला मिळत असलेल्या महिलांच्या प्रेमाविषयी स्पष्टपणे वक्तव्य केलं आहे आणि त्यासोबत खुलासा केला की त्यामुळे त्यांच्यावर या सगळ्याचा परिणाम झाला का? याविषयी सांगितलं आहे. त्याचं उत्तर देत सुनीतानं सांगितलं की एक अभिनेत्याची पत्नी असल्यामुळे खूप सुरक्षीत राहण्याची गरज असते आणि त्यासोबत मनानं हळवं रहावं लागत नाही.
यावेळी सुनीता आहुजा म्हणाल्या की, एक हीरोची पत्नी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या हृदयावर खूप मोठा दगड ठेवावा लागतो. नाही तर चुकूनही अभिनेत्याशी लग्न करू नका. सुनीतानं पुढे सांगितलं की महिलांना अटेंशन मिळतं त्यावरून काही अडचण नसते कारण त्यांना स्वत: वर विश्वास असतो. त्यांनी पुढे सांगितलं की तो असं म्हणत नाही आहे की त्यांचा नवरा हा गायीसारखा आहे आणि त्यानं म्हटलं की मला काही फरक पडत नाही. तुम्हाला स्वत: वर खूप विश्वास ठेवावा लागेल. शेवटी तो एक पुरुष आहे, तुम्ही असं बोलू शकत नाही की कोणताही पुरुष हा गाय असतो. काही झालं तरी रात्री ते घरीच येतात.
या आधी सिमी गरेवालला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत गोविंदानं या कारणाविषयी खुलासा केला होता की त्यांनं त्याची पत्नी सुनीता आहुजासोबतच त्याचं लग्न हे सीक्रेट ठेवलं होतं. त्यानं खुलासा केला की त्यावेळी, त्यानं सांगितलं की त्याच्या लग्नाच्या बातमीनं त्याचं बॉलिवूडमधील करिअर ही संपवलं असतं, कारण त्यावेळी लग्न हे सगळ्यांपासून लपवून ठेवणं हे अगदी साधारण गोष्ट होती.
हेही वाचा : मॅरिटल रेप सारखं काही नसतं? हे काय बोलून गेला आदिल खान! वादग्रस्त वक्तव्य करत फसला राखीचा EX नवरा
दरम्यान, गोविंदा आणि सुनीतानं तेव्हा त्यांच्या लग्नाला सगळ्यांपासून लपवून ठेवण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर गोविंदाला जाणीव झाली की ही एक चूक होती. खरंतर, त्यानं सांगितलं की त्याची पत्नी इतकी दयाळू आहे की तिनं त्याच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यानंतर सुनीतानं देखील विचारलं की त्याला कधी या गोष्टीचं वाईट वाटलं का? त्यावर त्यांनी नकार दिला.