'100 कोटींच्या प्रोजेक्ट नकारताच आरशासमोर स्वत:ला लगावली कानशिलात '; गोविंदाचं नक्की काय सुरुये?

Govinda : गोविंदानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यानं 100 कोटींच्या प्रोजेक्टला नकार दिल्याचा खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 20, 2023, 10:35 AM IST
'100 कोटींच्या प्रोजेक्ट नकारताच आरशासमोर स्वत:ला लगावली कानशिलात '; गोविंदाचं नक्की काय सुरुये? title=
(Photo Credit : Social Media)

Govinda : बॉलिवूड अभिनेता गोविंदानं नव्वदच्या दशकात एकत्र 70 चित्रपट केले होते. पदार्पणानंतर जवळपास 3-4 वर्षात गोविंदानं 40 चित्रपट केले. पण गेल्या काही वर्षांपासून तो चित्रपटांपासून दूर आहे. त्याला पुन्हा एकदा स्क्रिनवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याचे चाहते देखील त्याला अनेकदा हाच सवाल करतात. तर गोविंदानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटसृष्टीपासून लांब राहण्यावर चर्चा केली. त्यावेळी गोविंदानं खुलासा केला की त्यानं 2022 मध्ये 100 कोटींच्या चित्रपटाला नकार दिला. 

गोविंदानं काल गणेश चतुर्थीच्या निमित्तानं हा खुलासा केला आहे. यावेळी मीडियाशी बोलताना गोविंदा म्हणाला, मी कोणतंही काम लगेच स्विकारत नाही. पण जे लोक असा विचार करतात की मला काम मिळत नाही आहे. मला त्यांना सांगायचे आहे की माझ्यावर बाप्पाची कृपा आहे. गेल्या वर्षी मी 100 कोटीच्या प्रोजेक्टला नकार दिला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मस्करी करत गोविंदा पुढे म्हणाला, आरशासमोर उभ राहून मी स्वत: ला कानशिलात मारत होतो, कारण मी कोणताही प्रोजेक्ट साइन करत नव्हतो. गोविंदा म्हणाला, ते लोक खूप पैसे देत होते. पण मला कोणतीही साधारण भूमिका करायची नव्हती. मला असं काही करायचं होतं, जे मी आधी पहिले केलं आहे. त्या प्रकारचं काही हवं.'

गोविंदाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यानं 1986 मध्ये 'लव 86' चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि तो चित्रपट सुपरहिट ठरला होता. गोविंदा एका रात्रीत स्टार झाला आणि त्यानंतर त्यानं मागे वळून पाहिलं नाही. गोविंदानं 2019 मध्ये रंगीला राजा या चित्रपटात दिसला आणि तो पर्यंत त्यानं कोणत्याही नवी प्रोजेक्टची घोषणा केली नव्हती. 'रंगीला राजा' चित्रपटात गोविंदानं डबल रोल केला होता. 

हेही वाचा : शाहरुख खानच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, म्हणतो 'भरपूर मोदक खाण्यासाठी...'

गोविंदा आणि त्याची पत्नीनं नुकतीच शिल्पा शेट्टीच्या मुंबईच्या घरी हजेरी लावली होती. शिल्पा शेट्टीच्या घरी गणपतीचे वर्धापण करण्यात येते. त्यावेळी त्या दोघांना एकत्र पाहिले होते. दरम्यान, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओतील गोविंदा आणि त्याच्या पत्नीचा लूक प्रेक्षकांना प्रचंड आवडला आहे.