राज कुंद्राला 'या' मॉडेल आणि अभिनेत्रीकडून पाठिंबा, म्हणाली, एकता कपूरसुद्धा 'गंदी बात'...

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध व्यवसायिक राज कुंद्राला अटक 

Updated: Jul 20, 2021, 05:36 PM IST
राज कुंद्राला 'या' मॉडेल आणि अभिनेत्रीकडून पाठिंबा, म्हणाली, एकता कपूरसुद्धा 'गंदी बात'... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध व्यवसायिक राज कुंद्राला काल रात्री अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर अश्ली-ल चित्रपट बनवण्याचा आणि काही अ‍ॅप्सवर अपलोड केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांची क्राईम ब्रांचने या प्रकरणी त्वरित कारवाई केली आहे. सध्या या संदर्भात राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीकडून कोणतंही विधान समोर आलेलं  नाही, मात्र मॉडेल गेहाना वशिष्ठ त्याच्या समर्थनात आली आहे.

गेहना वशिष्ठचा राज कुंद्राला पाठिंबा
राज कुंद्राच्या अटकेनंतर मॉडेल गेहाना वशिष्ठाने आपलं निवेदन जारी केलं आहे. तिने व्हिडिओ बनवून लोकांसमोर आपली बाजू मांडली आहे.  फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांनी याच प्रकरणात मालाडच्या मढमधून मॉडेल गेहना वशिष्ठला अटक केली होती. तिच्यावर अश्ली-ल फिल्म बनविल्याचा आरोप आहे. आता ती जामिनावर सुटली आहे.

गेहाना वशिष्ठने मांडली आपली बाजू
या संदर्भात बोलताना मॉडेल गेहाना वशिष्ठ म्हणाली, 'मला असं म्हणायचं आहे की, कोणीही अश्लील शूटींग करत नाहीत. एकता कपूर 'गांधी बात' बनवते आणि यात किती बोल्ड कन्टेंट असतो.  पहिलं ती फिल्म अश्लील आहेत की नाही हे पाहिलं गेलं पाहिजे.असा कोणताही व्हिडिओ आमच्या पॉर्नच्या प्रकारात येत नाही. यामध्ये पण काही कमी बोल्डनेस नाही. 18 वर्षांवरील सर्व लोक पॉ-र्न आणि एरोटिकामधील फरक समजू शकतात. माझा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे. गोष्टी चुकीच्या दाखवल्या जाऊ नयेत. सत्यता दाखवली गेली पाहिजे. काही लोकांना टार्गेट केलं जात आहे. या प्रकरणात शिल्पा शेट्टीचं नाव पुन्हा-पुन्हा घेतलं जात आहे. मी सर्वांना विनंती करते की पोर्नमध्ये इरॉटिका मिसळू नये'.

गेहाना वशिष्ठ पाच महिन्यांपासून तुरूंगात होती
अश्ली-ल व्हिडिओ प्रकरणात स्पष्टीकरण देताना गेहानाने सांगितलं की, ''एरोटिका आणि पॉर्नमधील गोंधळामुळे तिला पाच महिने तुरूंगात टाकलं गेलं.  माझा फोन आणि लॅपटॉप पोलिसांनी जप्त केला. माझं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. अशा परिस्थितीत योग्य ती गोष्ट दाखवा आणि सांगा अशी तिची विनंती आहे.''